ETV Bharat / state

तुकाराम महाराजांच्या पालखीचे पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान, लाखो वारकरी हरिनामाच्या गजरात दंग

अधून-मधून बरसणाऱ्या वरुण राजाच्या साक्षीने आज (सोमवार) जगतगुरु तुकाराम महाराजांच्या पालखीचे पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान झाले. यावेळी लाखो वारकरी तुकोबा - ज्ञानोबा, विठ्ठल नामाच्या गजरात दंग झाले होते.

तुकाराम महाराजांच्या पालखीचे प्रस्थान
author img

By

Published : Jun 24, 2019, 10:02 PM IST

Updated : Jun 24, 2019, 11:29 PM IST

पुणे - अधून-मधून बरसणाऱ्या वरुण राजाच्या साक्षीने आज (सोमवार) जगतगुरु तुकाराम महाराजांच्या पालखीचे पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान झाले. यावेळी लाखो वारकरी तुकोबा - ज्ञानोबा, विठ्ठल नामाच्या गजरात दंग झाले होते. यावेळी देहू परिसर भक्तीमय झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.

तुकाराम महाराजांच्या पालखीचे पंढरपूरच्या दिशेने प्रस्थान

पहाटे ५ वाजता पालखी सोहळ्याचे प्रमुख, अध्यक्ष आणि विश्वस्तांच्या हस्ते श्रींची शिळा मंदिरात महापूजा करण्यात आली. पहाटे साडेपाचच्या सुमारास पालखी सोहळ्याचे जनक तपोनिधी नारायनमहाराज समाधीची महापूजा करण्यात आली. त्यानंतर इनामदार वाड्यात श्रीसंत तुकोबांच्या पादुकांची महापूजा करण्यात आली. दुपारी साडेचारच्या सुमारास पालखीचे मुख्यमंदीरातून प्रस्थान झाले. या प्रस्थान सोहळ्यासाठी लाखो वारकरी देहूनगरीत दाखल झाले होते. ज्ञानोबा-माऊली तुकाराम'च्या जयघोषाने अवघी देहू नगरी दुमदुमून गेली होती.

pune
तुकाराम महाराजांच्या पालखीचे प्रस्थान

गेल्या २ दिवसांपासून वारकरी राज्याच्या कानाकोपऱ्यातून दाखल झाले होते. अनेक वारकरी हे देहू ते पंढरपूर पायी वारी करतात. संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान झाल्यानंतर पहिला मुक्काम इनामदार वाड्यात असतो. मंगळवारी सकाळी अनगडशहा बाबा येथे मानाची पहिली आरती होते. त्यानंतर पुढे पिंपरी-चिंचवड शहराच्या दिशेने पालखी मार्गस्थ होते. यावेळी लाखो वारकरी हरिनामाच्या गजरात पुढे सरसावत असतात.

Intro:mh pun dehu palkhi prasthan all 2019 pkg 7201348Body:mh pun dehu palkhi prasthan all 2019 pkg 7201348

anchor
अधून मधून बरसणार्या वरुण राजाच्या साक्षीने सोमवारी जगतगुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या पालखीने देहू तल्या मुख्यमदिरातून दुपारी पंढरपूर कडे प्रस्थान ठेवले, आषाढी वारीची लाखो वारकरी आतुरतेने वर्षभर वाट पहात असतात. सोमवारच्या प्रस्थान सोहळ्यात पहाटे पाचच्या सुमारास पालखी सोहळा प्रमुख, अध्यक्ष आणि विश्वस्तांच्या हस्ते श्रींची व शिळा मंदिरात महापूजा करण्यात आली. पहाटे साडेपाचच्या सुमारास पालखी सोहळ्याचे जनक तपोनिधी नारायनमहाराज समाधीची महापूजा करण्यात आली. त्यानंतर इनामदार वाड्यात श्रीसंत तुकोबांच्या पादुकांचे महापूजा करण्यात आली. आणि दुपारी साडेचार च्या सुमारास पालखीचे मुख्यमंदिरातून प्रस्थान झाले, या प्रस्थान सोहळ्यासाठी लाखो वारकरी देहूनगरीत दाखल झाले होते. ज्ञानोबा माऊली तुकाराम चा जयघोषाने अवघी देहू नगरी दुमदुमून गेली होती. गेल्या दोन दिवसांपासून वारकरी राज्याच्या कानाकोपऱ्यातून दाखल झाले होते. अनेक वारकरी हे देहू ते पंढरपूर पायी वारी करतात. संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान झाल्यानंतर पहिला मुक्काम इनामदार वाड्यात असतो. मंगळवारी सकाळी अनगडशहा बाबा येथे मानाची पहिली आरती होते. त्यानंतर पुढे पिंपरी-चिंचवड शहराच्या दिशेने पालखी मार्गस्थ होते. यावेळी लाखो वारकरी हरिनामाच्या गजरात पुढे सरसावत असतात. Conclusion:
Last Updated : Jun 24, 2019, 11:29 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.