ETV Bharat / state

आषाढी वारी..! जगद्गुरू तुकोबांच्या पादुका एसटी बसने जाणार पंढरपूरकडे.. - पंढरपूर वारी बातमी

संत तुकाराम महाराज यांच्या पारंपरिक रस्त्यानेच ही एसटी बस जाणार आहे. दरम्यान, जे प्रतिनिधी पादुकांसोबत जाणार आहेत, त्यांची कोरोना चाचणी केली आहे.

tukaram-maharaj-paduka-will-go-to-pandharpur-by-st-bus
तुकोबांच्या पादुका एसटी बसने जाणार पंढरपूरकडे..
author img

By

Published : Jun 27, 2020, 1:25 PM IST

Updated : Jun 27, 2020, 3:55 PM IST

पुणे- जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पादुकांना पंढरपूरकडे एसटी बसने 20 व्यक्तींसह जाण्याची परवानगी मिळाली आहे. त्यानुसार 30 जून रोजी महाराजांच्या पादुका पंढरपूरला मार्गस्थ होणार आहेत. संत तुकाराम महाराज यांच्या पारंपरिक रस्त्यानेच ही एसटी बस जाणार आहे. दरम्यान, जे प्रतिनिधी पादुकांसोबत जाणार आहेत, त्यांची कोरोना चाचणी केली जाणार आहे. तसचे वयवर्ष ६० पेक्षा जास्त असणाऱ्या व्यक्तींना परवानगी नाकारण्यात आली आहे.

तुकोबांच्या पादुका एसटी बसने जाणार पंढरपूरकडे..

दरवर्षी जगतगुरु संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा मोठ्या उत्साहात पंढरपूरकडे प्रस्थान ठेवत असतो. परंतु, यावर्षी कोरोना संकटामुळे अगदी मोजक्याच प्रतिनिधींच्या उपस्थितीत पालखी सोहळ्याचे प्रस्थान झाले. दरम्यान, संतांच्या पादुका या हेलिकॉप्टर मधून जाणार की एसटी बसमधून यावर भाविक भक्तांचे लक्ष होते. अखेर, आज प्रशासनाने जगतगुरु संत तुकाराम महाराज यांच्या पालखीला एसटी बसने काही अटीसह पंढरपूरकडे जाण्याची परवानगी दिली आहे.
पादुका घेऊन येताना पालन करावयाची कार्यपध्दती..
१) पादुकांसोबत जास्तीत जास्त २० व्यक्ती येऊ शकतील.
२) पादुकांसोबत असणाऱ्या व्यक्तिचे वय ६० वर्षापेक्षा जास्त असता कामा नये.
३) पादुका सोबत येणाऱ्या व्यक्तीला कोणत्याही स्वरुपाचा आजार (हायपरटेन्शन, बी.पी., डायबेटीस, अस्थमा दमा) असता कामा नये.
४) पादुकांसोबत येणाऱ्या सर्व लोकांची कोरोना टेस्टकरुन घेण्यात यावी.
५) एसटीत महाराष्ट्र शासनाने दिलेल्या आदेशांचे पालन होईल याची दक्षता घेणे गरजेचे आहे.
६) वाहनासोबत उपजिल्हाधिकारी किंवा तहसीलदार दर्जाचा एक अधिकारी नियुक्त करावा. जो सर्वांना प्रस्थानाच्या ठिकाणापासून पंढरपूर येथे घेऊन येईल.
७) वाहनासोबत पोलिसांची व्हॅन वायरलेस सेटसह प्रस्थानापासून पंढरपूर पर्यंत व पंढरपूर पासून पुन्हा मूळ
प्रस्थानाच्या ठिकाणी येईपर्यंत सोबत असणे आवश्यक आहे.
९) पादुकांना घेऊन जाणाऱ्या वाहनाचे प्रस्थान ठिकाण - ते पंढरपूर पर्यंतचा प्रवासाचा मार्ग नकाशा व लागणारा वेळ यासह तत्काळ विभागीय आयुक्त, पुणे यांना व कार्यकारी अधिकारी पंढरपूर विठ्ठल मंदिर यांना पाठवावा.
१०) वाहन प्रवासात कोठेही दर्शनासाठी थांबणार नाही याची दक्षता.

Last Updated : Jun 27, 2020, 3:55 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.