पुणे - सातारा राष्ट्रीय महामार्गावर एका चालत्या मालवाहतूक ट्रकने पेट घेतला. मालवाहतूक ट्रक हा सातारावरून पुण्याच्या दिशेने येत होता. अचानक वाहनाने पेट घेतल्याने महामार्गावरील पुण्याकडे जाणारी एकेरी वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली होती. ट्रकमध्ये कागदाचे पुठ्ठे असल्याने वाहनाने वेगाने पेट घेतला.
पुणे सातारा महामार्गावरील सारोळा गावाजवळ ही घटना घडली आहे. पुठ्ठे भरून मालवाहतूक ट्रक पुण्याच्या दिशेने येत होता. अचानक पेट घेतल्याने काही काळासाठी महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. स्थानिक आणि पोलिसांच्या मदतीने आग विझवण्यात आली.
सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. महामार्गावर वाहने पेट घेण्याच्या घटना घडत असतात. मात्र या मालवाहतूक ट्रकमध्ये कागदी पुठ्ठे असल्याने या ट्रकने चांगलाच पेट घेतला होता. ट्रक आग का लागली होती, याचं कारण अद्यापही स्पष्ट झालेलं नाही.
पुणे-सातारा महामार्गावर धावत्या ट्रकने घेतला पेट, पुण्याकडे जाणारी वाहतूक विस्कळीत - पुणे-सातारा महामार्गावर ट्रक पेटला
सातारा राष्ट्रीय महामार्गावर एका चालत्या मालवाहतूक ट्रकने पेट घेतली. मालवाहतूक ट्रक हा सातारावरून पुण्याच्या दिशेने येत होता. अचानक वाहनाने पेट घेतल्याने महामार्गावरील पुण्याकडे जाणारी एकेरी वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली होती.