ETV Bharat / state

Pune : लक्ष लक्ष दिव्यांनी सजले दगडूशेठ गणपती मंदिर, त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त ५२१ मिष्टान्नांचा महानैवेद्य... - Tripurari pornima celebreted

मंदिराच्या कळसासह संपूर्ण गाभा-यात लावलेल्या पणत्या, विविध प्रकारच्या फळांची केलेली आरास आणि मिठाई, फराळाच्या तिखट-गोड पदार्थांपासून वेगवेगळ्या पदार्थांचा दगडूशेठ गणपती मंदिरात ( dagdusheth mandir in pune ) अन्नकोट मांडण्यात आला. त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त ( Tripurari pornima celebreted ) लावलेल्या १ लाख दिव्यांनी मंदिराचा परिसर उजळून निघाला होता. पुणेकरांनी हे दृश्य डोळ्यामध्ये साठविण्यासोबतच मोबाईल कॅमे-यामध्ये कैद करण्यासाठी मोठी गर्दी केली.

Etv Bharat
Etv Bharat
author img

By

Published : Nov 7, 2022, 10:53 PM IST

पुणे : मंदिराच्या कळसासह संपूर्ण गाभा-यात लावलेल्या पणत्या, विविध प्रकारच्या फळांची केलेली आरास आणि मिठाई, फराळाच्या तिखट-गोड पदार्थांपासून वेगवेगळ्या पदार्थांचा दगडूशेठ गणपती मंदिरात ( dagdusheth mandir in pune ) अन्नकोट मांडण्यात आला. त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त ( Tripurari pornima celebreted ) लावलेल्या १ लाख दिव्यांनी मंदिराचा परिसर उजळून निघाला होता. पुणेकरांनी हे दृश्य डोळ्यामध्ये साठविण्यासोबतच मोबाईल कॅमे-यामध्ये कैद करण्यासाठी मोठी गर्दी केली.

५२१ मिष्टान्नांचा अन्नकोट - श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळाच्यावतीने त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दगडूशेठ गणपती मंदिरामध्ये १ लाख दिव्यांचा दीपोत्सव आणि ५२१ मिष्टान्नांचा अन्नकोट आयोजित करण्यात आला होता. यावेळी अप्पर पोलीस आयुक्त राजेंद्र डहाळे यांसह ट्रस्टचे विश्वस्त, कार्यकर्ते उपस्थित होते. मंदिराच्या कळसासह संपूर्ण गाभा-यात लावलेल्या पणत्यांनी मंदिराचा परिसर उजळून निघाला होता. याशिवाय तोरण आणि फुले, रांगोळ्यांनी मंदिराचा परिसर सजविण्यात आला.

त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त आयोजन - ट्रस्टचे अध्यक्ष माणिक चव्हाण म्हणाले, त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त आयोजित अन्नकोटाकरीता पदार्थ देण्याचे आवाहन ट्रस्टतर्फे करण्यात आले होते. त्यानुसार तब्बल ५२१ हून अधिक प्रकारचे पदार्थ भाविकांकडून मंदिरात गोळा झाले. ते सर्व पदार्थ अन्नकोटामध्ये मांडण्यात आले. या सर्व पदार्थांचा प्रसाद ससून रुग्णालयात आणि मंदिरातील भक्त यांना देण्यात येणार असल्याचे ट्रस्टतर्फे सांगण्यात आले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.