पुणे - चक्रीवादळासह पावसाचा जोर दुपारच्या सुमारास वाढला आहे. या वादळाने राजगुरुनगर पाईट रोडवरील घाटाच्या वळणावर तीन झाडे कोसळली आहेत. यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. याठिकणी महसूल विभाग आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने मदतकार्य सुरु करण्यात आल्याची माहिती तहसीलदार सुचित्रा आमले यांनी दिली.
चक्रीवादळ आणि पावसाचा जोर वाढत असल्ययाने नागरिकांनी या काळात प्रवास करु नये. तसेच घरात व सुरक्षित स्थळी राहावे, असे आवाहन तहसीलदार सुचित्रा आमले यांनी केले. आज सकाळपासून खेड तालुक्यातील विविध भागात चक्रीवादळाचे रौद्ररुप पाहायला मिळाले. त्यामुळे, नागरिकांची धावपळ उडाली आहे. अशात शेतीसह जोडव्यवसायांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची भिती निर्माण झाल्याने शेतकरी चिंतेत आहेत.