ETV Bharat / state

पंतप्रधानांच्या सभेसाठी मैदानावरील झाडांची कत्तल! - महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९

17 तारखेला पुण्यातील सर परशुराम(एसपी) महाविद्यालयाच्या मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होणार आहे. या सभेच्या मैदानावर असलेली दहा ते पंधरा झाडे कापल्याचे समोर आले आहे.

तोडलेली झाडे
author img

By

Published : Oct 15, 2019, 4:23 PM IST

Updated : Oct 16, 2019, 9:25 PM IST

पुणे - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पुण्यामध्ये 17 तारखेला सभा होत आहे. पुण्यातील सर परशुराम(एसपी) महाविद्यालयाच्या मैदानावर ही सभा होणार आहे. या सभेच्या मैदानावर असलेली दहा ते पंधरा झाडे कापल्याचे समोर आले आहे.

पंतप्रधानांच्या सभेसाठी मैदानावरील झाडे तोडली

सर परशुराम(एसपी) महाविद्यालयाच्या मैदानातील या झाडांवर पंतप्रधानांच्या सभेसाठी कुऱ्हाड चालवण्यात आल्याची चर्चा आहे. महानगरपालिकेच्या परवानगीनेच झाडे तोडल्याचा दावा आयोजकांनी केला आहे. तर महाविद्यालयाच्या संस्था चालकांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी काही झाडांच्या फांद्या तोडल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.

हेही वाचा - राष्ट्रवादीचा जुना पैलवान भाजपच्या तालमीत, माजी आमदार बापू पठारे भाजपात

मात्र, नरेंद्र मोदींच्या सभेसाठी ज्या ठिकाणी स्टेज उभारण्यात येणार आहे त्या ठिकाणच्या झाडे पुर्णपणे तोडण्यात आली आहेत. आजूबाजूच्या परिसरातील झाडांच्या फांद्या छाटल्या आहेत.

Intro:पंतप्रधानांच्या सभेच्या मैदानावरील झाडे तोडलीBody:mh_pun_02_pm_sabha_tree_cutting_avb_7201348

Anchor
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची पुण्यामध्ये 17 तारखेला सभा होते आहे पुण्यातल्या महाविद्यालयाच्या मैदानावर ही सभा 17 तारखेला सायंकाळी होणार आहे या सभेच्या मैदानावर असलेली दहा-पंधरा झाडे कापण्यात आल्याचं समोर आले आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी पुण्यात झाडांची कत्तल करण्यात आल्याची चर्चा आहे सर
परशुराम महाविद्यालयाच्या मैदानातील या झाडांवर कुऱ्हाड सभेसाठी कुऱ्हाड चालवण्यात आल्याची चर्चा सुरू झालीय...शुक्रवारी 17 तारखेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची याच मैदानात होणार सभा...दरम्यान महापालिकेच्या परवानगीनेच झाड तोडल्याचा आयोजकांचा दावा आहे तर महाविद्यालय संस्था चालकांनी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी काही झाडांच्या फांद्या तोडल्याचे स्पष्टीकरण दिले आहे मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेसाठी ज्या ठिकाणी स्टेज उभारण्यात येणार आहे त्या सभेच्या जवळ असलेल्या झाडांवर कुऱ्हाड चालविण्यात आली आहे तर परिसरातल्या झाडांच्या फांद्या छाटण्यात आले आहे त्यामुळे पंतप्रधानांच्या या सभेसाठी झाडांची कत्तल करण्यात आल्याचा आरोप करण्यात येतोय....
Byte एस के जैन, अध्यक्ष शिक्षण प्रसारक मंडळी Conclusion:
Last Updated : Oct 16, 2019, 9:25 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.