पुणे - महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात सोमवारी सकाळी प्रशिक्षण विमान ( training plane crashed ) कोसळल्याने 22 वर्षीय महिला प्रशिक्षणार्थी पायलट किरकोळ ( Training Plane Crashed In Indapur ) जखमी झाल्याची माहिती स्थानिक पोलिसांनी दिली. अधिकाऱ्यांनी जखमी प्रशिक्षणार्थी पायलटची ओळख भाविका राठोड ( Bhavika Rathod ) अशी केली आहे. हे विमान कार्व्हर एव्हिएशनचे आहे ज्याचे मुख्यालय जिल्ह्यातील बारामती येथे आहे. बारामतीतील विमानतळावरून सकाळी उड्डाण केलेले विमान इंदापूर तालुक्यातील कडबनवाडीनजीक कोसळले आहे. विमान ( plane crashed ) कशामुळे पडले, याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. बारामतीत कार्व्हर एव्हिएशन मार्फत महिला पायलट प्रशिक्षण दिले जात होते. आज सकाळी बारामतीतून विमानतळावरून ( Baramati Airport ) उड्डाण केलेले हे विमान फिरत असतानाच अचानक कडबनवाडी येथील शेतकरी बारहाते यांच्या शेतात कोसळले आहे.
हेही वाचा - Former Minister Arjun Khotkar : जालनामध्ये शिवसेनेला भगदाड; अर्जुन खोतकर यांचा शिंदे गटात जाहीर प्रवेश?
पोलीस अधीक्षक (पुणे ग्रामीण) अभिनव देशमुख यांनी सांगितले की, राठोड “सकाळी 11.30 च्या सुमारास झालेल्या अपघातात किरकोळ जखमी झाल्या आहेत”. त्यांना शेलगाव परिसरातील खासगी रुग्णालयात नेण्यापूर्वी त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. अपघाताच्या वेळी राठोड विमानात एकट्याच होत्या,असे पोलिसांनी सांगितले.
'हे' आहेत आतापर्यंतचे विमान अपघात -
13 जून 2022 - रोजी उत्तर प्रदेशातील अमेठी येथे प्रशिक्षणार्थी वैमानिकाचे हलके विमाण कोसळे होते. विमाण क्रॅश-लँड झाल्याने पायलट अभय पटेल थोडक्यात बचावले होते. ते केंद्र सरकारच्या इंदिरा गांधी राष्ट्रीय उरण अकादमी (IGRUA) चे प्रशिक्षण-विमान उडवत होते.
16 जून 2022 - झारखंडमधील जमशेदपूर येथे 16 जून 2022 रोजी दोन प्रशिक्षण विमानांचा अपघात झाला होता. त्यानंतर विमान वाहतूक नियामक DGCA ने सर्व उड्डाण प्रशिक्षण संस्थांचे (FTOs) सुरक्षा ऑडिट करण्याचे आदेश दिले होते. जमशेदपूर येथे झालेल्या अपघातात पायलट लँडिंग गियर उघडण्यास विसरला, तर दुसरे विमान उत्तर प्रदेशातील सुलतानपूर येथे धावपट्टीवर कोसळले होते.
26 फेब्रुवारी 2022 - तेलंगनाच्या नलगोंडा जिल्ह्यात 26 फेब्रुवारी 2022 रोजी एक प्रशिक्षणार्थी विमान शेतात कोसळले होते. घटनेच्या वेळी विमानात एक पायलटसह प्रशिक्षणार्थी पायलट होते. यावेळी एका वैमानिकाचा अपघातात मृत्यू झाला होता. हे विमान हैदराबादमधील फ्लाइंग इन्स्टिट्यूटचे होते.
17 जुलै 2021- महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यात फ्लाइंग स्कूलचे छोटे विमान कोसळून एका फ्लाइट इन्स्ट्रक्टरचा मृत्यू झाला होता.तर, दुसरा प्रशिक्षणार्थी पायलट जखमी झाला होता. TECNAM P-2008 Jc हे विमान चोपडा येथील वर्दी गावाजवळ कोसळले होते. इटालियन मेकचे दोन आसनी विमान NMIMS अॅकॅडमी ऑफ एव्हिएशन (NMIMSAA) चे होते. धुळे जिल्ह्यातील शिरपूरस्थित फ्लाइंग स्कूल, मुंबईतील नामांकित श्री विलेपार्ले केळवणी मंडळ (SVPKM) च्या शैक्षणिक संस्थांच्या गटाशी संलग्न होते.
7 ऑगस्टला 2019 - विकाराबाद जिल्ह्यातील बंटवाराम मंडलातील सुलतानपूर गावात 7 ऑगस्टला विमान दुर्घटना झाली होती. याच वैमानिकासह एक महिला प्रशिक्षणार्थींचा मृत्यू झाला होता.
5 फेब्रुवारी 2019 -बारामती येथील खाजगी विमान वाहतूक प्रशिक्षण संस्थेतील प्रशिक्षणार्थी विमान 5 फेब्रुवारी 2019 रोजी अपघातग्रस्त झाले होते. हे विमान पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील रुई गावाजवळ क्रॅश झाले होते. प्रशिक्षणार्थी नियमित प्रशिक्षणासाठी जात असताना दुपारी बाराच्या सुमारास ही घटना घडली होती. सिद्धार्थ टायटस असे वैमानिकाचे नाव असून तो अपघातानंतर किरकोळ जखमी झाला होता.
8 सप्टेंबर 2008 -रोजी सेसना ट्रेनर विमान हैदराबादमधील बेगमपेट विमानतळाजवळ दाट लोकवस्तीच्या भागात कोसळले होते. यात दोन जणांचा मृत्यू झाला होता.
हेही वाचा - Katrina Kaif Threat Case : कतरिना आणि विक्कीला धमकी देणाऱ्याला अटक; मुंबई पोलिसांची कारवाई