पुणे- पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील उर्से टोलनाक्यावर वाहनांची गर्दी पाहायला मिळत आहे. मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांच्या एक ते दीड किलोमीटरपर्यंत लांबच लांब रांगा लागल्या आहेत. विकएन्ड संपवून प्रवासी मुंबईला परतत असल्याने वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.
वाहनांच्या लांबच लांब रांगा
पुणे - मुंबई महामार्गावर विकएन्डला नेहमीच गर्दी होत असते. दरम्यान, आज देखील याची प्रचिती आली असून, आठवड्यातील दुसरा शनिवार आणि रविवार अशा दोन सुट्या आल्याने अनेक जण फिरण्यासाठी पुण्यात आले होते. मात्र सुटी संपून परत मुंबईला जाताना महामार्गावर गर्दी झाली आहे. उर्से टोलनाक्यावर वाहनांच्या एक ते दीड किलोमिटर पर्यंत लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहे. वाहतूक कोंडी झाल्याने प्रवासी त्रस्त्र झाले आहेत.