पुणे - नाताळ आणि नवीन वर्षामुळे अनेकांना सलग सुट्ट्या मिळाल्या आहेत. यामुळे पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे. पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाताना उर्से टोलनाका येथे आणि खोपोली टोलनाका येथे दोन ते तीन किलोमीटर लांब वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.
हेही वाचा - कोरेगाव-भीमा शौर्यदिवस : पुणे महानगर परिवहनतर्फे 260 बसचे नियोजन
सलग सुट्ट्याचा आनंद घेण्यासाठी अनेक पर्यटक लोणावळा आणि आसपासच्या पर्यटनस्थळी जात आहेत. परिणामी पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावर वाहतूक कोंडी होत आहे. आगामी तीन-चार दिवस वाहतूक कोंडी सुटण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे महामार्ग पोलीस आणि वाहतूक पोलिसांची कसोटी लागणार आहे. या वाहतूक कोंडीपासून स्वतःची सुटका करण्यासाठी अनेक नागरिक घरापासून जवळच असलेल्या ठिकाणांना पसंती देत आहेत.