ETV Bharat / state

पिंपरी-चिंचवडमध्ये सार्वजनिक वाहतुकीवर बंदी; मध्यरात्रीपासून आदेश लागू

पिंपरी-चिंचवड शहरात एकूण १२ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहे. त्या पार्श्वभूमीवर आता जमावबंदीसह शहरातील अंतर्गत सार्वजनिक वाहतूक बंद करण्यात आली आहे. यात पीएमपीएमएल बसेसचा ही समावेश आहे. मध्यरात्री १ वाजल्यापासून हा आदेश लागू करण्यात आला असून ३१ मार्चपर्यंत लागू असेल.

traffic closed  pimpari chinchwad  पिंपरी चिंचवड वाहतूक  corona upddate
पिंपरी-चिंचवडमध्ये सार्वजनिक वाहतुकीवर बंदी; मध्यरात्रीपासून आदेश लागू
author img

By

Published : Mar 25, 2020, 11:35 AM IST

पुणे - पिंपरी-चिंचवड शहरात जमावबंदीचे आदेश देण्यात आले असून सार्वजनिक वाहतुकीस बंदी घालण्यात आली आहे. यातून अत्यावश्यक सेवांची वाहतूक करणाऱ्या वाहनांना वगळण्यात आले आहे. दरम्यान, गल्लीमध्ये लहान मुलांना सायकल खेळण्यास देखील बंदी घालण्यात आल्याचे पोलीस प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत बाहेरून येणाऱ्या वाहनांना मज्जाव करण्यात आला असून त्यांना शहरात प्रवेश नाकारण्यात येणार आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात एकूण १२ कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहे. त्या पार्श्वभूमीवर आता जमावबंदीसह शहरातील अंतर्गत सार्वजनिक वाहतूक बंद करण्यात आली आहे. यात पीएमपीएमएल बसेसचा ही समावेश आहे. मध्यरात्री १ वाजल्यापासून हा आदेश लागू करण्यात आला असून ३१ मार्चपर्यंत लागू असेल. गल्लीमध्ये खेळल्या जाणाऱ्या सायकली, पारंपरिक व अपारंपरिक इंधनावर चालणाऱ्या मोटार सायकल, स्कूटर, तीनचाकी वाहने, हलकी वाहने, अवजड अशा सर्व वाहनांना वाहतुकीस बंदी घालण्यात आली आहे. आदेशाचे पालन न झाल्यास कलम १८८ नुसार कारवाई करण्यात येईल, असेही पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.