पुणे - कोरोना विषाणूच्या संसर्गाची साखळी तोडण्यासाठी मार्च महिन्यात देशात सुरू करण्यात आलेला लॉकडाऊन टप्प्याटप्प्याने अनलॉक करण्यात येत आहे. तसेच राज्य सरकारनेदेखील मिशन बिगीन अगेनचा नारा देत राज्याच्या अर्थ चक्राचा गाडा रुळावर आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले. यामध्ये लहान मोठे व्यवसाय सुरू करण्यास परवानगी देण्यात आली. मात्र, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता पर्यटन स्थळे अद्यापही लॉकच आहेत. त्यामुळे गडकिल्ल्यांवर विंसबून असलेला पर्यटन व्यवसाय अद्यापही पर्यटकांच्या प्रतीक्षेत आहेत. माथेरान सुरू झाले मात्र गडकिल्ल्यांसाठीच बंदी का? असा सवाल सिहगडावरील स्थानिक व्यवसायिक विचारताहेत.
आतातरी गडकिल्ले सुरू करा... सिंहगडावरील स्थायिक व्यावसायिकांची सरकारला आर्त हाक - पर्यंटन स्थळे सुरू करण्याची मागणी
लॉकडाऊन काळात पर्यटनव्यवसाय बंद करण्यात आला. मात्र, आता अनलॉकच्या चौथ्या टप्प्यातही पर्यटनस्थळांना परवानगी देण्यात आलेली नाही. त्यामुळे पर्यंटनस्थळाच्या ठिकाणी व्यवसाय करून संसाराचा गाडा हाकणाऱ्या छोट्यामोठ्या व्यावसायिकावर आर्थिक संकट कोसळले आहे. सिहंगडावरील स्थानिक व्यावसायिकांनी पर्यटन स्थळे पर्यटांकासाठी लवकरात लवकर सरू करावी अशी विनंती राज्य सरकारला केली आहे.