पुणे- जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. खबरदारी म्हणून सरकारने लाॅकडाऊन लागू केले आहे. यामुळे अनेक गोष्टींवर निर्बंध आल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. ते नुकसान कमी म्हणून की काय, निसर्ग चक्रीवादळानेही शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. टोमॅटोचे उभे पीक वाया गेले आहे. आता पाऊस पडत आहे. त्यामुळे टोमॅटोवर करपा, दावण्या रोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. यामुळे उत्पादन तर घटलेच शिवाय बाजारात योग्य भावही मिळत नाही. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.
जुन्नर, आंबेगाव, शिरुर खेड तालुक्यात 50 हजार हेक्टरवर टोमॅटोची लागवड केली जाते. यंदाच्या वर्षी शेतकऱ्यांनी ऐन उन्हाळ्यात मोठ्या खर्च करुन टोमॅटोची लागवड केली होती. मात्र, आता या टोमॅटोला भावच नाही. शेतकऱ्यांनी टोमॅटोसाठी केलेला खर्चही मिळणे मुस्कीलीचे आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लावण्यात आलेल्या लाॅकडाऊनमुळे टोमॅटोची मागणी घटली आहे. बाजारसमितीचे व्यवहार बंद आहेत. त्यामुळे 10 किलोला 100 ते 350 रुपये बाजार भाव सध्या टोमॅटोला मिळत आहे जो की अतिशय कमी असल्याचे शेतकरी सांगतात. या भावातून उत्पादन खर्च तर सोडाच मात्र मजुरी, वाहतूक खर्चही निघत नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
हेही वाचा- नाशकात जुना वाडा कोसळून तरुणाचा मृत्यू, तिघे जखमी