ETV Bharat / state

'उपमुख्यमंत्र्यांच्या भल्या सकाळच्या दौऱ्यामुळे अधिकाऱ्यांची दमछाक'

author img

By

Published : Jan 10, 2020, 6:01 PM IST

अजित पवार यांनी आज पुण्यातील शिवाजीनगर येथील नव्याने बांधकाम सुरू असलेल्या व जुन्या पोलीस वसाहतीची पाहणी केली. पोलीस कर्मचारी यांच्या कुटुंबियांशी संवाद साधला.

today Deputy cm ajit pawar visited pune
उपमुख्यमंत्र्यांच्या भल्या सकाळच्या दौऱ्यामुळे अधिकाऱ्यांची दमछाक

पुणे - राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कामाचा धडाका सर्वश्रृत आहे. आज त्यांच्या काम करण्याच्या याच पद्धतीमुळे अधिकारी वर्गाची चांगलीच दमछाक झाल्याचे दिसून आले. अजित पवार यांनी पुणे येथे सकाळी-सकाळीच आपल्या पाहणी दौऱ्याला सुरुवात केल्याने अधिकाऱ्यांची तारांबळ उडाली होती. सकाळी लवकर उठून काम करण्याची सवय असल्याची माहिती यावेळी पवार यांनी दिली आहे. तसेच शरद पवारांनाही सकाळी लवकर उठून कामाला लागायची सवय असल्याचे अजित पवार यावेळी म्हणाले.

हेही वाचा - LIVE : संमेलनाच्या उद्घाटन कार्यक्रमासाठी व्यासपीठ सज्ज; गोरोबा काका नगरीत मान्यवरांची उपस्थिती

अजित पवार यांनी आज पुण्यातील शिवाजीनगर येथील नव्याने बांधकाम सुरू असलेल्या व जुन्या पोलीस वसाहतीची पाहणी केली. पोलीस कर्मचारी यांच्या कुटुंबीयांशी संवाद साधला. पोलीस कुटुंबीयांच्या अडचणी सोडविण्यासाठी लवकरात लवकर वसाहतीचे काम पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. शिवाय पुणे शहर आणि जिल्हा प्रशासनाच्या विविध अधिकाऱ्यांशीही विविध प्रश्नांवर चर्चा केली.

Intro:सकाळी लवकर उठून कामाला लागायची मला सवय आहे - अजित पवार

उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज सकाळी सकाळी पुण्यात कामकाजाला सुरवात केली. त्यांच्या या दौऱ्यामुळे प्रशासकीय अधिकाऱ्यांची मात्र चांगलीच दमछाक झाली. दरम्यान आजच्या या पहाटेच्या दौऱ्यावर प्रतिक्रिया देताना अजित पवार म्हणाले, मला आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना सकाळी लवकर उठून कामाला लागायची सवय आहे आणि सवय आहे त्याला कोणी नाही म्हणू शकत असे सांगत आपली बाजू स्पष्ट केली.

Body:अजित पवार यांनी आज पुण्यातील शिवाजीनगर येथील नव्याने बांधकाम सुरू असलेल्या व जुन्या पोलीस वसाहतीची पाहणी केली. पोलीस कर्मचारी यांच्या कुटुंबियांशी संवाद साधत पोलीस कुटुंबियाला भेडसावणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी लवकरात लवकर वसाहतीचे काम पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. शिवाय पुणे शहर आणि जिल्हा प्रशासनाच्या विविध अधिकाऱ्यांशीही विविध प्रश्नांवर चर्चा केली.

Conclusion:परंतु अजित पवार यांनी भल्या पहाटे कामाला सुरुवात केल्यामुळे अधिकाऱ्यांची मात्र धावपळ उडाली होती. भर थंडीत अधिकारी पवार यांना भेटायला येतानाचे दृश्य बघायला मिळत होते. याबाबत पवार यांना विचारले असता, ' मला आणि शरद पवार यांना सकाळी लवकर उठून कामाला लागायची सवय आहे. आता ती सवय आहे, त्याला कोणी नाही म्हणू शकत नाही. अजित पवार काही रोज सकाळी उठून इथे येणार नाही. मी आठ दिवसांनी येणार.मग आठ दिवसांतून अधिकाऱ्यांनी लवकर आलं तर काहीच बिघडत नाही'.
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.