पुणे : या अपघातग्रस्त व्यक्तींना कस्तुरी प्रतिष्ठान, लाईफ केअर रुग्ण वाहिकेच्या मदतीने उरुळी कांचन येथील गणराज हॉस्पिटल, सिध्दीविनायक हॉस्पिटल, झेड प्लस हॉस्पिटल या ठिकाणी उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
गाडीवरील नियंत्रण सुटले अन्: अपघाताबाबत अधिक माहिती अशी की, टेम्पो हा पुण्याकडे निघाला होता. तर चारचाकी गाडी ही सोलापूरच्या दिशेने निघाली होती. टेम्पोमध्ये बांधकामाच्या लोखंडी प्लेट होत्या. यावेळी टेम्पो चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले आणि तो सोलापूरच्या बाजूने निघालेल्या चारचाकी गाडीवर जाऊन आदळला. त्याने बाजूने जाणाऱ्या एका दुचाकीलाही धडक दिली.
दोन मुले किरकोळ जखमी: अपघात एवढा भीषण होता की, टेम्पो हा चारचाकी गाडीच्या बोनेटवर जाऊन थांबला. यावेळी गाडीत असलेले पती-पत्नी व त्यांची दोन मुले किरकोळ जखमी झाली आहेत. टेम्पोतील दोघेजण गंभीर जखमी झाले असून दुचाकीवरील व्यक्ती देखील जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे.
पालखीत दुचाकी घुसल्याने अपघात: बीडच्या उदंड वडगाव येथे मुक्ताईची पालखी आल्यानंतर पालखी विश्रांतीसाठी वारकरी थांबले होते. पालखीमध्ये असलेल्या महिलांना दुचाकीस्वाराने धडक दिली. त्यामुळे तीन महिला जखमी झालेल्या आहेत.
अपघातात महिला जखमी: आषाढी वारीनिमित्त अनेक भक्तगण विठ्ठलाच्या भेटीसाठी पाई वारी करत आहेत. दोन दिवसापूर्वीच बीड वरून मुक्ताईची पालखी पंढरपूरकडे प्रस्थान झाली. उदंड वडगाव येथे मुक्कामी असलेल्या वारकऱ्यांना एका दुचाकी चालकाने धडक दिली. त्यामुळे तीन महिला वारकरी जखमी झाल्या आहेत. त्यामुळे या वारकऱ्यांना उपचारार्थ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दुचाकीस्वाराने पळ काढला: या महिलांना कुणाला पायाला तर कुणाला हाताला जखम झालेली आहे. जखमींमध्ये सावित्री सुभाष शेळके, सरुबाई सोनू कोड़े, पुरणाबाई पवार या महिलांचा समावेश आहे. या आपल्या गावावरून मुक्ताईच्या पालखीमध्ये विठ्ठलाच्या भेटीसाठी निघाल्या होत्या. अचानक झालेल्या या अपघाताने त्यांची वारी अपूर्ण राहते की काय? असा प्रश्न यांनी उपस्थित होत आहे. मात्र या अपघातातील दुचाकी स्वाराने या ठिकाणाहून पळ काढला आहे.