ETV Bharat / state

CBSC Schools : शिक्षण क्षेत्रात खळबळ; सीबीएससी शाळांचा घोटाळा उघड, पैसे मागणारी बनावट टोळीचा पर्दाफाश - M P International School and Jr College

पुण्यात सीबीएससी शाळांचा घोटाळा उघड झाला ( Three CBSC Schools With Fake NOC In Pune ) आहे. पैसे मागणाऱ्या बनावट टोळीचा पर्दाफाश झाला आहे. 12 लाख घेऊन तीन शाळांना सीबीएससी प्रमाणपत्र देण्यात ( Paid 12 Lakhs For Fake CBSE Certificate ) आले आहेत. एम.पी. इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, नमो आरआयएमएस इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, क्रिएटिव्ह एज्युकेशन सोसायटी पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज अशी त्यांची नावे आहेत.

Three CBSC Schools With Fake NOC In Pune
पुण्यात सीबीएससी शाळांचा घोटाळा उघड
author img

By

Published : Jan 7, 2023, 1:43 PM IST

पुण्यात सीबीएससी शाळांचा घोटाळा उघड

पुणे : विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यातच शैक्षणिक बाजार मांडला गेला आहे. तब्बल 12 लाख रुपये घेऊन तीन शाळेला सीबीएससी प्रमाणपत्र देण्याचा गैरव्यवहार समोर आला ( Paid 12 Lakhs For Fake CBSE Certificate ) आहे. त्यानंतर पुण्यामध्ये ज्या तीन शाळांचे नाव होते. त्या शाळेतील एका शाळेच्या मुख्याध्यापकाने आमच्या शाळेला मान्यता मागितली नाही. आम्ही तसा अर्जही केला नव्हता याचा खुलासा आम्ही शिक्षण विभागाच्या अधिकारी आमच्याकडे आल्यानंतर, केला असल्याच या शाळेच्या मुख्याध्यापकांनी म्हटला ( Three CBSC Schools With Fake NOC In Pune ) आहे.

कुठल्या आहेत बोगस NOC देणाऱ्या शाळा?: शिक्षक पात्रता परीक्षा घोटाळानंतर आता शिक्षण क्षेत्रात दुसरा मोठा घोटाळा उघडकीस आला आहे. बनावट ना हरकत पत्र देऊन तीन केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्डाच्या शाळा सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. एम.पी. इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज ( M P International School and Jr College ) , बीएमसीसी रोड, शिवाजीनगर. नमो आरआयएमएस इंटरनॅशनल स्कूल अँड ज्युनियर कॉलेज ( Namo RIMS International School and Jr College ) आणि क्रिएटिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज ( Creative Education Society Public School and Jr College ) . या तिन्ही सीबीएससी इंग्रजी माध्यमाच्या शाळांचे जे शासनाचे प्रमाणपत्र आहे. ते प्रमाणपत्र बनावट असल्याचे आढळून आलं आहे. १२ लाखात बनावट एनओसी देणारी टोळी कार्यरत असल्याचंही समोर आलं आहे. मंत्रालयातील अधिकाऱ्यांकडून ही एनओसी दिली जाते. पण ही टोळी चक्क बारा लाखात सीबीएसीच्या संस्था चालकांना देत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

शाळांची माहिती शासनाला दिली : या शाळांची माहिती आम्ही शासनाला दिली आहे. त्यांच्यावर फौजदारी स्वरूपाची कारवाई करण्यात येणार आहे. प्रत्येक सीबीएससी शाळांनी आपली मान्यता प्रमाणपत्र शासनाच्या बोर्डाच्या खाली ते लावावं, जेणे करून ज्यांची मान्यता आहे त्यांची मान्यता समोर येईल. अशा सूचना आम्ही जिल्ह्यातील शिक्षण अधिकारी, प्रशासन अधिकारी यांना सूचना दिल्या आहेत. ज्यांची मान्यता नसेल तेही यामुळे समोर येतील. अशी माहिती शिक्षण संचालक यांनी दिलेली आहे. शिक्षण क्षेत्रात एवढी मोठी टोळी कार्यरत असताना शिक्षण विभागाच्या किंवा या शाळेच्या लक्षात कशी आली नाही. ही नेमकी टोळी बोगस शाळेचे नाव घेऊन अशी किती प्रमाणपत्र काढले. याचा शोध घेणे महत्त्वाचा आहे यामध्ये मोठा आर्थिक घोटाळा झाल्याचा दिसते. शिक्षण विभागातील काही लोक यात होते का हे पहाणे देखील महत्त्वाचा आहे ?

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.