पुणे : दिवाळीच्या मध्यरात्री तीन आरोपी मोटारसायकलवरून परिसरात आले असता त्यांनी परिसरात उभ्या असलेल्या कार, दुचाकी आणि ऑटो रिक्षांची तोडफोड सुरू केल्याची घटना घडली. आरोपीने परिसरात पार्क केलेल्या वाहनांची केवळ तोडफोड ( vandalizing vehicles Incidents ) केली. इतकच नव्हे तर पार्क केलेल्या वाहनांचे विंडशील्ड तोडण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करणाऱ्या रहिवाशांपैकी एकाला धमकावले.
आरोपीस अटक - आरोपीने जबरदस्तीने लोकांचे मोबाईल फोन आणि रोख रक्कम लुटली आणि दोघांना मारहाण केली. ज्या लोकांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला त्यानांही मारहाण केली . पोलिसांकडून अनुज जितेंद्र यादव 19, दक्ष जुबेर गिलानी 20 राहुल उर्फ बाबा विनोद बरवासा 23 यांना अटक करण्यात आली ( Three arrested )आहे.
आरोपींकडून मोबाईल जप्त - याप्रकरणी तिघांविरुद्ध फरासखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हे शाखेकडून तपास सुरू होता. पोलीस नाईक अमोल पवार व इम्रान शेख यांना तोडफोड व लूटमार करणाऱ्या आरोपींची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी सापळा रचून तिघांना पकडले. बुधवारी त्या आरोपींना पोलिसांनी अटक केली असून त्यांच्याकडून २७ हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल संच जप्त करण्यात आले आहेत.