ETV Bharat / state

MP Shrikant Shinde : ज्यांना महाराजांचा इतिहास माहिती नाही त्यांनी वादग्रस्त वक्तव्य करु नये - खासदार श्रीकांत शिंदे

ज्या लोकांना छत्रपती शिवाजी महाराजांचा ( Chhatrapati Shivaji Maharaj ) इतिहास माहित नाही, अशा लोकांनी वादग्रस्त वक्तव्य करु नये. प्रत्येकाने तारतम्य ओळखूनच छत्रपती शिवाजी महाराज ( Controversial statement about Chhatrapati Shivaji Maharaj ) यांच्या बद्दल विधान केली पाहिजे असे खासदार श्रीकांत शिंदे ( MP Shrikant Shinde ) यांनी म्हटले आहे. ते आज पुण्यात बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या ( Shiv Sena of Balasaheb ) मेळ्याव्यात बोलत होते.

author img

By

Published : Dec 4, 2022, 10:31 PM IST

Updated : Dec 4, 2022, 11:08 PM IST

MP Shrikant Shinde
MP Shrikant Shinde

पुणे : भाजपाचे आमदार प्रसाद लाड ( BJP MLA Prasad Lad ) यांनी कोकण महोत्सवाच्या कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोकणात झाला आहे, असे विधान केले ( Controversial statement of Prasad Lad ) होते. त्यांनी केलेल्या या वादग्रस्त वक्तव्यावर अनेक राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. बाळासाहेबांची शिवसेना ( Shiv Sena of Balasaheb ) पक्षाचे खासदार श्रीकांत शिंदे ( MP Shrikant Shinde ) यांनी देखील यावर आपल मत व्यक्त केलं आहे.

खासदार श्रीकांत शिंदे

महाराजांच्या बाबतीत बेताल वक्तव्य करु नये - ज्यांना इतिहास माहीत नाही अशा लोकांनी चुकीचे विधाने करू नये. कोणत्याही पक्षाचा कार्यकर्ता असाला तरी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बाबतीत बेताल वक्तव्य करता कामा नये असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांनी म्हटले आहे. ते आज पुण्यात बाळसाहेबांची शिवसेना पक्षाच्या मेळाव्यात बोलत होते.

विधान करताना हजार वेळा विचार करा - कोणीही उठत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बाबतीत विधान करतो हे चूकच असून प्रत्येकाने आपली पातळी बघूनच बोलावं. मग तो आमच्या पक्षातील असो की कुठल्याही दुसऱ्या पक्षाचे असो. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बाबतीत विधान करताना हजार वेळा विचार करूनच बोलावे असे शिंदे म्हणाले.

खासदार संजय राऊत यांच्यावर टीका - यावेळी खासदार श्रीकांत शिंदे यांनी शिवसेना खासदार संजय राऊत ( Shinde criticism of MP Sanjay Raut ) यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली. ते म्हणाले की, सगळ्यांना माहीत आहे की, दरोरोज सकाळी सकाळी येऊन कोण दिवस खराब करतो. राज्यात मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली खूप चांगल्या पद्धतीने काम सुरू आहे. जे निर्णय कधीच घेण्यात आले नव्हते ते निर्णय या राज्यातील जनतेसाठी घेतले जात आहे. कोणीही कोणत्या जागेच्या बाबतीत दावा केलेला नाही. राज्यात युतीच्या सरकार आहे. युतीच्या माध्यमातूनच येणाऱ्या निवडणुका पुढे लढवल्या जातील असे श्रीकांत शिंदे यांनी संकेत दिले आहेत.

मंत्रिमंडळ विस्तार लवकरच - राज्यात मंत्रिमंडळाच्या विस्तार कधी होईल याबाबत शिंदे यांना विचारला असता ते म्हणाले की, मंत्रिमंडळाचा विस्तार हा लवकरच होणार आहे. याबाबत राज्याचे मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री यानी देखील विस्ताराबाबत माहिती दिली आहे. तसेच या सरकारमधील कोणीही नाराज नसल्याचे यावेळी शिंदे यांनी सांगितले.

Last Updated : Dec 4, 2022, 11:08 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.