ETV Bharat / state

शारदा गणपतीचे दागिने चोरणाऱ्या चोरट्याला मुंबईच्या दागिना बाजारातून अटक

पुण्यातील मानाच्या गणपतींपैकी एक असणाऱ्या शारदा गणपतीच्या मंदिरात शुक्रवारी पहाटेच्या सुमारास जबरी चोरी झाली होती. चोरट्याने रात्री मंदिरात प्रवेश करत वीस ते पंचवीस तोळे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली होती. मुंबईतील दागिना बाजार परिसरातून त्याला अटक केली आहे. त्याच्याकडे पाच लाख 13 हजार रुपये किमतीचे दागिने आणि दीड लाखांची रोख रक्कम सापडली.

author img

By

Published : Jan 10, 2021, 12:22 PM IST

पुणे शारदा गणपती मंदिर न्यूज
पुणे शारदा गणपती मंदिर न्यूज

पुणे - पुण्यातील मानाच्या गणपतींपैकी एक असणाऱ्या शारदा गणपतीच्या मंदिरात शुक्रवारी पहाटेच्या सुमारास जबरी चोरी झाली होती. चोरट्याने मंदिरात प्रवेश करत वीस ते पंचवीस तोळे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली होती. या चोरट्याला पकडण्यात यश आले असून मुंबई लोहमार्ग पोलिसांनी मुंबईतील दागिना बाजार परिसरातून त्याला अटक केली आहे. अजय महावीर भुक्तर (वय 19) असे या चोरट्याचे नाव आहे.

हेही वाचा - कुंपणच खातंय शेत? ताडोबात गौण खनिजाचे अवैध उत्खनन, पर्यावरणाची मोठी हानी

घटना सीसीटीव्हीत कैद

पुण्याच्या मध्यवस्तीतील मंडई परिसरात शारदा गणपतीचे मंदिर आहे. या मंदिरामध्ये सीसीटीव्ही कॅमेराही आहे. असे असतानाही अज्ञात चोरट्याने शुक्रवारी पहाटेच्या सुमारास मंदिरात प्रवेश करत तब्बल वीस ते पंचवीस तोळे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली होती. या मंदिरापासून काही अंतरावर पोलीस चौकी आहे. हा परिसर सातत्याने गजबजलेला असतो. तरीदेखील या मंदिरात अशाप्रकारे चोरी झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

चोरट्याला मुद्देमालासह पकडण्यात यश

पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेचे पथक या चोरट्याच्या मागावर होते. दरम्यान, मुंबई लोहमार्ग पोलिसांची पथके शनिवारी रात्रीच्या सुमारास दागिना बाजार परिसरातील धनजी स्ट्रीट नाका येथे गस्त करीत असताना त्यांना एक व्यक्ती संशयास्पद अवस्थेत दिसून आली. त्याला ताब्यात घेऊन अंगझडती घेतली असता, त्याच्याजवळ पाच लाख 13 हजार रुपये किमतीचे दागिने आणि दीड लाखांची रोख रक्कम सापडली. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता, त्याने पुण्यातील शारदा गणपती मंदिरात चोरी केल्याची कबुली दिली.

हेही वाचा - अजब...प्रचारासाठी उमेदवाराच्या मुलाने चक्क घरावर ठेवला ऑटोरिक्षा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.