ETV Bharat / state

बारामतीत घरफोडी, १ लाख ५७ हजारांचा माल लंपास - Thief enter in closed bungalow in Baramati

बंद बंगल्याच्या पाठीमागील दरवाजाचे दार तोडत अज्ञात चोरट्याने आत प्रवेश केला. त्याने १ लाख ५७ हजार रुपयांचा माल लंपास केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

Thief enter in closed bungalow
बारामतीत घरफोडी
author img

By

Published : Mar 6, 2020, 12:01 AM IST

पुणे - बंद बंगल्याचा पाठीमागील दरवाजा तोडून आतमध्ये प्रवेश करत अज्ञात चोरट्याने रोख रक्कम व सोन्या-चांदीचे दागिने असा १ लाख ५७ हजार रुपयांचा माल लंपास केला. याबाबत शहर पोलीस ठाण्यात आदिती दिपक माने (रा. हरीकृपानगर, इंदापूर रोड, बारामती) यांनी फिर्याद दाखल केली.

बारामती शहरात ३ मार्चच्या मध्यरात्री ही घटना घडली. फिर्यादीच्या बंद बंगल्याच्या पाठीमागील दरवाजाचे दार तोडत अज्ञाताने आत प्रवेश केला. किचनमधील लोखंडी कपाट व बेडरुममधील लाकडी कपाट उचकटून त्यातून रोख रक्कम व सोन्या-चांदीचे दागिने असा १ लाख ५७ हजार रुपयांचा माल लंपास केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

या चोरीमुळे बारामतीत या अज्ञात चोरट्याचा विषय चर्चेत होता. याप्रकरणी बारामती पोलीस अधिक तपास करीत आहेत.

हेही वाचा - जेव्हा रक्षकच बनतात भक्षक, तरुणांना लुटणारे गजाआड

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.