ETV Bharat / state

Supriya Sule On Ajit Pawar: 'राष्ट्रवादी'मध्ये कोणतीही फूट पडलेली नाही, अजित पवार हे.. - सुप्रिया सुळे

अजित पवार यांनी भाजपासोबत हातमिळवणी करून ते उपमुख्यमंत्री झाले. यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात कोणतीही फूट पडलेली नाही, असे पक्षाच्या वरिष्ठ नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले आहे. आमच्यापैकी काही लोकांनी वेगळा निर्णय घेतला आहे आणि त्याबाबत तक्रार आम्ही सभापतींकडे केलेली आहे, असे त्या म्हणाल्या.

Supriya Sule On Ajit Pawar
सुप्रिया सुळे
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 24, 2023, 3:56 PM IST

Updated : Aug 24, 2023, 4:57 PM IST

अजित पवारांच्या भूमिकेविषयी मत मांडताना सुप्रिया सुळे

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पक्षाचे नेते अजित पवार यांनी बंड केल्यानंतर अजित पवार गटाने पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचे फोटो वापरू नये असे खुद्द शरद पवार यांनी सांगितले होते. अजित पवार गटाकडून शरद पवार यांचे फोटो वापरले जात होते. पण, कालपासून पवार यांचे फोटो वापरणे बंद केले आहे. यावरून राष्ट्रवादीत आता उभी फूट पडली आहे, असे स्पष्ट होत आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे यांना विचारलं असता त्या म्हणाल्या की, पक्षात फूट पडलेली नाही. आमच्यापैकी काही लोकांनी वेगळा निर्णय घेतला आहे आणि त्याबाबत तक्रार आम्ही स्पीकरकडे केलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कुठलीही फूट पडलेली नाही. पक्षाचे देशाचे अध्यक्ष शरद पवार आहेत आणि राज्याचे अध्यक्ष हे जयंत पाटील आहेत, असे स्पष्ट मत यावेळी सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केले आहे.

Supriya Sule On Ajit Pawar
सुप्रिया सुळे पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तरे देताना

राकॉंची भाजपसोबत युती नाही : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज महापालिका आयुक्त यांची भेट घेत बारामती मतदार संघातील विविध प्रश्नांवर चर्चा केली. यावेळी त्यांनी राज्य सरकारला आवाहन केले की, जनतेचे खूपच प्रश्न प्रलंबित असल्याने लवकरात लवकर महापालिकेच्या निवडणुका या घेण्यात याव्या. अजित पवार यांचा राष्ट्रवादीत दर्जा काय आहे, याबाबत सुप्रिया सुळे यांना विचारलं असता त्या म्हणाल्या की, ते आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि आमदार आहेत. त्यांनी पक्षाच्या विरोधात काही वेगळी भूमिका घेतली आहे आणि त्याविरोधात तक्रार आम्ही स्पीकर यांच्याकडे केली आहे. त्यांच्या उत्तराची आम्ही वाट बघत आहोत. आमच्या पक्षाची भाजपाबरोबर कुठलीही युती नाही आणि आघाडी देखील नाही, असे देखील यावेळी सुप्रिया सुळे म्हणाल्या.

पक्ष फोडण्याचा अनेकदा प्रयत्न : एका वृत्तपत्रात पक्षफोडीबाबत जे विधान केलं आहे त्याबाबत त्या म्हणाल्या की, अनेकवेळा राष्ट्रवादी कॉंग्रेसपक्ष फोडण्याचा प्रयत्न हा झाला आहे. काही वेळेला अयशस्वी झाला तर काही वेळेस यशस्वी देखील झाला. भाजपसाठी साम, दाम, दंड, भेद वापरून सत्तेत येणं हेच महत्त्वाचं आहे. गेल्या दीड वर्षांत आपण सर्व पाहात आहोत की, कशा पद्धतीने या सरकारचं काम चाललं आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेस संभ्रमात नाही: अजित पवार गटाचे देखील सुनील तटकरे हे प्रदेशाध्यक्ष आहेत आणि त्यांच्याकडून नियुक्त्या राज्यभर केल्या जात आहेत. यावर सुप्रिया सुळे यांनी स्पष्ट केले की, ते काय करत आहेत ते आम्हाला माहीत नाही. आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसबाबत बोलत आहोत. कोणताही कार्यकर्ता तसेच नेता संभ्रमात नाही. शरद पवार ४ वेळा मुख्यमंत्री झालेत. पक्षाची स्थापना झाल्यापासून पवारांनी एकदाही विधानसभा निवडणूक लढवली नाही. त्यांनी देशातील राजकारणावर लक्ष केंद्रित केलं आणि इंडिया आघाडीतील सगळे लोक आजही शरद पवारांना नेता मानतात. आमदार त्यांच्या नेतृत्वात निवडून येतात. अनेकवेळा आमचा पक्ष राज्यात एक नंबरला होता आणि मला आठवत आहे की, पक्षाने आतापर्यंत फक्त 114 जागा लढवल्या आहेत.

भुजबळांची ती टीका नव्हे : अजित पवार गटाचे नेते छगन भुजबळ यांनी पवारांवर केलेल्या टीकेवर बोलताना सुप्रिया सुळे यांनी भुजबळ बोलतात ती टीका नाही त्या त्यांच्या भावना आहेत. एक उपमुख्यमंत्री भाजपचे आहेत, हे मला माहीत आहे. दुसरे कोणत्या पक्षाचे आहेत मला माहीत नाही, असा टोला देखील सुप्रिया सुळेंनी यावेळी लगावला.

हेही वाचा:

  1. Supriya Sule On Sharad Pawar: शरद पवार कालही योद्धा होते, आजही योद्धा आहे आणि उद्याही राहणार- सुप्रिया सुळे
  2. Amit Shah : शरद पवारांचा उल्लेख करून अमित शाहांचा सुप्रिया सुळेंना टोला, म्हणाले..
  3. Watch Video : भाजपाने ९ वर्षांत ९ सरकार...; सुप्रिया सुळेंचा केंद्रावर हल्लाबोल

Last Updated : Aug 24, 2023, 4:57 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.