ETV Bharat / state

Pune Accident : नवले पूल अपघात प्रकरणात ट्रक चालकाला पोलिसांनी घेतल ताब्यात - 47 vehicles were blown up

रविवारी रात्री नवले पुल येथे एका ट्रक चालकाने गाडी न्युट्रल करून बंद करून येत असताना एक भीषण अपघात (Pune Accident) झाला. या ट्रक चालकाने एक नव्हे दोन नव्हे तब्बल 47 गाड्यांना उडवले आणि या गाड्यांचे मोठे नुकसानदेखील केले आहे.ही घटना घडल्या नंतर ट्रक चालक हा फरार झाला होता. पण अखेर पोलिसांनी त्याचा शोध घेत त्याला ताब्यात घेतले आहे.

Pune Accident
पुणे अपघात
author img

By

Published : Nov 22, 2022, 10:04 AM IST

पुणे: रविवारी रात्री नवले पुल येथे एका ट्रक चालकाने गाडी न्युट्रल करून बंद करून येत असताना एक भीषण अपघात झाला. या ट्रक चालकाने एक नव्हे दोन नव्हे तब्बल 47 गाड्यांना उडवले आणि या गाड्यांचे मोठे नुकसानदेखील केले आहे. ही घटना घडल्या नंतर ट्रक चालक हा फरार झाला होता. पण अखेर पोलिसांनी त्याचा शोध घेत त्याला ताब्यात घेतले आहे. मनीराम यादव (Driver Maniram Yadav) असे या ट्रक चालकाचे नाव आहे. त्याला चाकण येथून ताब्यात घेतले आहे.

मुख्यमंत्र्यांनी दखल घेत दिले कारवाईचे आदेश: साताऱ्याहून मुंबईच्या दिशेने निघालेल्या कंटेनरवरील (एपी 02 टीई5858) चालकाचे नियंत्रण सुटले आणि 48 गाड्यांना उडवत कंटेनर वाडगाव पुलाजवळ आदळला. यानंतर चालक घटनास्थळावरुन फरार झाला होता. यामुळे एकच खळबळ उडाली होती. याप्रकरणी सिंहगड रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. तसेच, या अपघाताची मुख्यमंत्र्यांनीही दखल घेत कारवाईचे आदेश दिले होते (Chief Minister Eknath Shinde). तर, प्रथमदर्शनी ब्रेक फेल झाल्याने अपघात घडल्याचे समजत होते. मात्र, तपासाअंती चालकाने उतारावरून गाडी बंद केल्याने ट्रकवरील नियंत्रण सुटल्याचे समोर आले आहे. यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली आणि अखेर आज ट्रक चालकाला पकडण्यात यश आले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.