पुणे - कोंढवा दुर्घटनेत मृत्यू झालेल्या कामगारांचे मृतदेह ससून रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आले आहेत. कामगारांच्या पुणे परिसरात असलेले नातेवाईक या घटनेची माहिती मिळाल्यानंतर ससून रुग्णालयामध्ये दाखल झाले. सुन्न मनस्थितीमध्ये हे नातेवाईक ससून रुग्णालयाच्या आवारात उभे होते. आपल्या नातेवाईकांचे मृतदेह शोधण्यासाठी रामविलास शर्मा आले होते. त्यांचे काका आलोक शर्मा यांच्यासह शर्मा कुटूंबातील चार जण या दुर्घटनेत ठार झाले आहेत. त्यांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत मिळावी एवढीच अपेक्षा असल्याचे ते म्हणाले.
रंजा साहनी यांचा सख्खा भाऊ लक्ष्मीकांत साहनी यांचा ही या दुर्घटनेत मृत्यू झाला. ते ही या घटनेने हादरून गेलेत. या घटनेत मृत्यू झालेल्या कामगारांचे पुणे परिसरात असलेल्या नातेवाईकाना घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. ससून रुग्णालयामध्ये ही काही नातेवाईक दाखल झाले आहेत.