ETV Bharat / state

आगीमागे घातपात असल्याच्या शक्यतेबाबत तपास केला जाईल - अजित पवार

author img

By

Published : Jan 21, 2021, 10:22 PM IST

सिरम इन्स्टिट्यूटमध्ये जी आग लागली आहे या आगीमागे घातपात असल्याची शक्यता काही लोकप्रतिनिधींनी व्यक्त केली आहे. त्यामुळे, खरच असे झाले का? याचा तपास केला जाईल, असे मत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले.

Ajit Pawar
अजित पवार

पुणे - सिरम इन्स्टिट्यूटमध्ये जी आग लागली आहे या आगीमागे घातपात असल्याची शक्यता काही लोकप्रतिनिधींनी व्यक्त केली आहे. त्यामुळे, खरच असे झाले का? याचा तपास केला जाईल, असे मत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सिरम इन्स्टिट्यूटला भेट दिली

हेही वाचा - धर्मादाय आयुक्तांच्या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात जाणार - विजय पाटकर

सिरम इन्स्टिट्यूटमध्ये लागलेल्या आगीत 5 कामगारांचा गुदमरून मृत्यू झाला. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सिरम इन्स्टिट्यूटला भेट दिली आणि आग लागलेल्या इमारतीची पाहणी केली. यावेळी पवार यांनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसापूर्वी भेट दिलेल्या सिरम कंपनीतील इमारतीच्या वरच्या मजल्यावर आग लागली होती. आगीच्या घटनेची चौकशी करण्यात येणार आहे. कंपनीकडूनही चौकशी करण्यात येत आहे. उद्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घटनास्थळी भेट देणार असल्याची माहिती आहे. कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावाला परदेशात असल्यामुळे त्यांची भेट होऊ शकली नाही, असे सांगितले.

दिवस उजडताच यासंबंधी ऑडिट सुरू होणार

आग विझवण्यासाठी स्थानिक फायर ब्रिगेडच्या जवानांनी चांगले काम केले. दिवस उजडताच यासंबंधी ऑडिट सुरू होणार आहे. आत पोलिसांचा तगडा बंदोबस्त तयार करण्यात आला आहे, असेही अजित पवार म्हणाले. आग लागल्यानंतर आतील स्प्रिंकलर चालू झाले होते. पण, आग भडकल्यामुळे त्यांचा उपयोग झाला नाही. या आगीत पाच लोकांचा मृत्यू झाला, असे म्हणत अजित पवार यांनी मृतांना श्रद्धांजली अर्पण केली.

हेही वाचा - धक्कादायक...! जबरदस्तीच्या वेश्याव्यवसायातून अल्पवयीन मुलगी गर्भवती, प्रसुतीनंतर प्रकार उघडकीस

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.