ETV Bharat / state

'एकदा गेला तो पुन्हा आलाच नाही'; सिरममध्ये मृत्यू झालेल्या प्रतीकच्या आईचा आक्रोश - सिरम आग बळी प्रतीक पाष्टे न्यूज

पुण्याच्या मांजरी भागातील सिरम इन्स्टिट्यूटमध्ये लागलेली आग आटोक्यात आली आहे. सध्या अग्निशामक दलाकडून कुलींगचे काम सुरू आहे. या आगीत शेवटच्या मजल्यावर अडकलेल्या 5 जणांचा मृत्यू झाला आहे.

Prateek Pashte
प्रतीक पाष्टे
author img

By

Published : Jan 22, 2021, 12:30 PM IST

पुणे - मांजरी भागातील सिरम इन्स्टिट्यूटमध्ये काल दुपारी (गुरुवारी) भीषण आग लागली. या आगीत शेवटच्या मजल्यावर अडकलेल्या 5 जणांचा मृत्यू झाला. या आगीत प्रतीक पाष्टे या तरुणाचा होरपळून मृत्यू झाला. प्रतीक इलेक्ट्रिशियनचे काम करण्यासाठी सिरम इन्स्टिट्यूटमध्ये गेला होता. काम करत असताना अचानक आग लागली व त्याचा आतमध्येच जीव गेला.

सिरममध्ये मृत्यू झालेल्या प्रतीकच्या आईचा आक्रोश

एकदा गेला तो पुन्हा आलाच नाही -

प्रतीक काल कामावर जाण्याअगोदर चावी देण्यासाठी दुकानावर आला होता. काम पूर्ण करून लवकर घरी येतो, असे सांगून तो गेला होता. मला येऊपर्यंत तू हळू-हळू काम कर, असेही सांगून गेला. मात्र, तो गेला तर परत आलाच नाही, असा आक्रोश त्याच्या आईने केला आहे.

नुकतीच केली होती कामाला सुरुवात -

पुण्यातील प्रभात रस्त्यावरील गल्ली क्रमांक-14मध्ये प्रतीक आपली आई, वडील आणि छोट्या भावासोबत राहत होता. त्याचे वडील सध्या रुग्णालयात अ‌ॅडमिट आहेत. हातावर पोट असणारे हे कुटुंब आहे. त्याचा छोटा भाऊ पंधरा वर्षे वयाचा आहे तर, त्याची आई प्रभात रस्त्यावर चहाचे स्टॉल चालवते. प्रतीकने नुकतेच आपले शिक्षण पूर्णकरून कामाला सुरुवात केली होती. आपल्या कुटुंबाचा तो आधार बनू पाहत होता. परंतु, सिरममधील दुर्दैवी घटनेत त्याचा मृत्यू झाला. गुरुवारी दुपारी तो महेंद्र इंगळे या आपल्या वरिष्ठ सहकाऱ्या सोबत सिरम इन्स्टिट्यूटमध्ये काम करण्यासाठी गेला होता. त्यानंतर तो परत आलाच नाही.

मृतांच्या नातेवाईकांना सिरमची मदत -

सिरम इन्स्टिट्यूटच्या इमारतीला लागलेल्या आगीमध्ये मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांना प्रत्येकी २५ लाख रुपयांची मदत इन्स्टिट्यूटकडून जाहीर करण्यात आली आहे. सिरम इन्स्टिट्यूटसाठी आजचा दिवस अतिशय दु:खद आहे. दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्या कुटुंबियांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत. कंपनीच्या निर्धारित नियमांच्या पलीकडे जाऊन दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी २५ लाखांची मदत जाहीर करत आहोत, असे सीरमचे व्यवस्थापकीय संचालक सायरस पुनावला यांनी म्हटले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.