ETV Bharat / state

खासगी रुग्णालयांनी 'डॅशबोर्ड अपडेट' न केल्यास कारवाई होणार - महापौर - पिंपरी-चिंचवड कोरोना बातमी

पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या लक्षात घेता खाटांची संख्या कमी पडत असून खासगी रुग्णालयांमध्ये कोरोनाग्रस्तांसाठी खाटा राखीव ठेवण्यात आले आहेत. पण, खासगी रुग्णालयातील खाटांची माहिती उपलब्ध होत नसल्याने रुग्णांची तारांबळ होत असल्याचे निदर्शनास येत आहे. यामुळे खासगी रुग्णालयांनी वेळीच डॅशबोर्ड अपडेट करावेत, अशा सूचना महापौर उषा ढोरे यांनी आयुक्त राजेश पाटील यांना केल्या.

बैठकीतील छायाचित्र
बैठकीतील छायाचित्र
author img

By

Published : Mar 30, 2021, 8:24 PM IST

पिंपरी-चिंचवड (पुणे) - पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या लक्षात घेता खाटांची संख्या कमी पडत असून खासगी रुग्णालयांमध्ये कोरोनाग्रस्तांसाठी खाटा राखीव ठेवण्यात आले आहेत. पण, खासगी रुग्णालयातील खाटांची माहिती उपलब्ध होत नसल्याने रुग्णांची तारांबळ होत असल्याचे निदर्शनास येत आहे. यामुळे खासगी रुग्णालयांनी वेळीच डॅशबोर्ड अपडेट करावेत, अशा सूचना महापौर उषा ढोरे यांनी आयुक्त राजेश पाटील यांना केल्या. यासंदर्भात, दररोज खाटांची माहिती महापालिका वॉररुमकडे सादर न करणा­ऱ्या खासगी रुग्णालयावर कारवाई करण्याचे आदेश आयुक्तांनी प्रशासनास दिले.

शहरातील कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या लक्षात घेता चिंचवड विधानसभेचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली आयुक्त यांच्या दालनात महापौर ढोरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती. स्थायी समितीचे सभापती, उपमहापौर, नगरसेवक, आयुक्त, अतिरिक्त आयुक्त व वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.

उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या

या बैठकीत डॉ. सतिष कांबळे यांनी कोरोना रुग्णांना भेडसावणा­ऱ्या समस्या, महापालिका रुग्णालय, शासकीय रुग्णालय, खासगी रुग्णालयातील कोरोना रुग्णांच्या उपचारार्थ उपाययोजना व भविष्यात लागणारे खाट, ऑक्सिजन, व्हेटिलेटर आदींची त्वरित उपलब्धता व्हावी. जास्तीत जास्त नागरिकांना कोव्हिशिल्ड लसीकरण करून घेण्यासाठी लसीकरण केंद्र वाढविण्यात यावे. कोविड रुग्णवाहिका, लागणारे डॉक्टर इत्यादी विषयावर चर्चा करून महापौर ढोरे यांनी महापालिका प्रशासनाला कोरोना परिस्थितीवर मात कशी करता येईल, यावर उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या.

हेही वाचा - देहूत मोजक्याच वारकऱ्यांच्या उपस्थित पार पडला संत तुकाराम बीज सोहळा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.