ETV Bharat / state

Rishi Sunak Book : ऋषी सुनक यांच्यावरील पुस्तक ठरलं बेस्ट सेलर, आठ दिवसांत पुस्तकाची तिसरी आवृत्ती - Rishi Sunak

ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्यावर लिखीत पुस्तक बेस्ट सेलर ठरत आहे. पत्रकार दिगंबर दराडे यांनी लिहिलेलं ऋषी सुनक या पुस्तकाच्या अनेक प्रतिंची विक्री झाली आहे.

Rishi Sunak Book
Rishi Sunak Book
author img

By

Published : May 14, 2023, 9:13 PM IST

पुणे : ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्यावर पत्रकार दिगंबर दराडे यांनी लिहिलेलं ऋषी सुनक हे पुस्तक बेस्ट सेलर ठरत आहे. काही दिवसांमध्येच 5 ते 8 हजार पुस्तकांची विक्री झाली असून तरुणांचे या मराठी माणसावर लिहिलेल्या पुस्तकाकडे कल जास्त दिसून आला आहे. पत्रकार दिगंबर दराडे हे पत्रकारिता बरोबरच विविध विषयांवर अभ्यास देखील करत आहे. त्यांनी लंडन येथे जाऊन सुनक यांच्या व्यक्तीमत्वाचे विविध पैलू उलगडले आहेत. विशेष म्हणजे या पुस्तकाला ऑनलाईन देखील युवक युवतींकडून मोठा प्रतिसाद मिळत असल्याचे समोर आले आहे.

ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक : ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक हे इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती, सुधा मूर्ती यांचे जावई आहेत. ज्या देशाने आपल्यावर दीडशे वर्ष राज्य केले त्या देशाचा पंतप्रधान एक भारतीय वंशाचा हिंदू आहे. या अभूतपूर्व घटनेने भारतीय म्हणून आपली छाती नक्कीच फुलून येते. एक स्थितप्रज्ञ, हिंदू संस्कृतीचा अभिमान बाळगणारे, मंदिरात जाऊन पूजा करणारे, गोपूजा करणारे, गीतेवर हात ठेवून खासदारकीची शपथ घेणारे ब्रिटनचे पंतप्रधान पाहून भारतीयांना त्यांचा अभिमान वाटतच आहे. हीच बाबी दराडे यांनी आपल्या पुस्तकात मांडली आहे.

ऋषी सुनक यांच्या पुस्तकाला प्रतिसाद : आपले कर्तव्य हाच आपला धर्म आहे. हा विचार पक्का करून सुनक पहिल्या दिवसापासून कामाला लागले आहेत. दिवस-रात्र मेहनत करत आहेत, असे यावेळी दराडे म्हणाले. यावेळी माय मिररचे मनोज अंबिके म्हणाले की, ऋषी यांच्यावर लिहिलेल्या पुस्तकाला चांगला प्रतिसाद मिळत असून दोनच दिवसांमध्ये आम्ही दुसरी आवृत्ती काढण्याचा निर्णय घेतला आहे. याच बरोबर हे पुस्तक विविध भाषांमध्ये आणण्याचाही आमचा संकल्प आहे. मी ब्रिटिश नागरिक आहे. येथे माझे घर आहे. हा माझा देश आहे परंतु माझा धार्मिक आणि सांस्कृतिक वारसा भारतीय आहे. माझी पत्नी भारतीय आहे. मी एक हिंदू आहे आणि याचा मला सार्थ अभिमान आहे, असे ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी म्हटल आहे.

(प्रेस नोट)

  1. Mahavikas Aghadi : लोकसभा, विधानसभा निवडणुका महाविकास आघाडी एकत्र लढवणार
  2. Mahavikas Aghadi : कर्नाटकचा निकाल महाविकास आघाडीला नवसंजीवनी देणार का?
  3. Sudhir Mungantiwar : उद्धव ठाकरेंना धडा शिकवायचा होता; पहाटेच्या शपथविधीबाबत मुनगंटीवारांचा खळबळजनक खुलासा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.