पुणे - कोरोनामुळे राज्याचा गाडा विस्कळीत झाला असून, आर्थिक ताण वाढत चालला आहे. त्यामुळे राज्यातील जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी टाळेबंदी शिथिल करण्याच्या दिशेने राज्य सरकारने मोठे पाऊल टाकत रेस्टॉरंट व बिअर बार सुरू करण्यास परवानगी दिली. पुणे शहरात अनेक रेस्टॉरंटनी तयारीही सुरू केली. पण, कोणतीही लेखी परवानगी न मिळाल्याने पुण्यातील काही बिअरबार चालकांनी ही परवानगी मिळेपर्यंत तोपर्यंत बिअर बार चालू न करण्याचा निर्णय घेतला आहे.
गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाचा प्रार्दुभाव वाढत असल्याने राज्य सरकारने अनेक ठिकाणी निर्बंध कायम ठेवले होते. मात्र, ऑक्टोबरपासून त्यापैकी काही गोष्टींवरील निर्बंध उठवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य सरकारने यासंदर्भातील आदेश जारी केला आहे. 5 ऑक्टोबरपासून राज्यातील रेस्टॉरंट व बार सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. मात्र, एकूण क्षमतेच्या 50 टक्के ग्राहकांनाच प्रवेश देण्याचे बंधन सरकारने घातले आहे.
कोरोनाबाबातचे सर्व नियम पाळणार असल्याचे म्हणत लेखी आदेश मिळाले तरच, बार सुरू करणार असल्याचे वंसत बारचे मालक सदानंद शेट्टी म्हणाले. ते म्हणाले, टाळेबंदीच्या काळात कोणतेही उत्पन्न मिळाले नाही. मात्र, सरकारकडून या सहा महिन्यांच्या फीची मागणी होत आहे. तसेच अनेक कामगार आपापल्या गावी गेल्याने कामगारांचाही प्रश्न उपस्थित होत असल्याचे शेट्टी म्हणाले.
राज्य सरकारने फक्त तोंडी परवानगी दिली आहे. कोणतीही कायदेशीर लिखित परवानगी आम्हाला मिळाली नसल्याने आम्ही बिअर बार चालू करू शकत नाही. उद्या (सोमवार) बार सुरू केले तर राज्य उत्पादन शुक्लविभागाकडून कारवाईही होऊ शकते, म्हणून जोपर्यंत लेखी परवानगी मिळत नाही तोपर्यंत बिअर बार सुरू करणार नाही, असा पवित्रा बार चालक-मालकांनी घेतला आहे. यामुळे प्रेमींना प्रतीक्षा करावी लागणार आहे.
हेही वाचा - 'भाजपाच्या नेत्यांनाच खऱ्या संस्काराची गरज'