ETV Bharat / state

Naresh Maske Critics: नरेश म्हस्केंची अजित पवारांवर खोचक टीका; म्हणाले, 'स्वतःचे ठेवायचे झाकून... - अजित पवार टीका

शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. कसबा पोटनिवडणूकीच्या प्रचार सभेत अजित पवार यांनी राज्य सरकारवर टीका केली होती. नरेश म्हस्के यांनी शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांच्या पुण्यातील बैठकीत पवारांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले.

Naresh Maske Critics
नरेश म्हस्के
author img

By

Published : Feb 13, 2023, 6:12 PM IST

Updated : Feb 13, 2023, 8:20 PM IST

नरेश म्हस्के माध्यमांसोबत संवाद साधताना

पुणे: स्वतःचे ठेवायचे झाकून आणि दुसऱ्याचे बघायचे वाकून अशी परिस्थिती अजित पवारांची सवय असल्याची टीका शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश मस्के यांनी केली आहे. कसबा पोट निवडणुकीसाठी आज बाळासाहेबांचे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांची बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी नरेश मस्के यांनी अजित पवारांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे.

काय म्हणाले म्हस्के: नरेश म्हस्के म्हणाले की, अजित पवारांनी सकाळचा शपथविधी घेतला ते बंड होते, गद्दारी होती की शरद पवारांच्या विरोधात उठाव होता, ते आधी अजितदादांनी स्पष्ट करावे. अजित पवार सकाळी तोंड न धुता शपथविधीला गेले होते आणि शरद पवारांचा मानसपुत्र म्हणणाऱ्या ठाण्यातील नेत्यांनी अजित पवारांचे पुतळे जाण्याचे आदेश दिले होते. म्हणून स्वतःचे ठेवायचे झाकून आणि दुसऱ्याचे बघायचे वाकून अशी परिस्थिती अजित पवारांची सवय आहे, अशी टीका केली आहे.

संजय राऊतांवर टीका : संजय राऊत जेलमधून आल्यानंतर त्यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. ते सकाळी सकाळी भोंग्याप्रमाणे सुरु होतात. जर एकनाथ शिंदेना मुख्यमंत्री कुणी मानत नाही मग यांना मानतात का? असा प्रश्न म्हस्के यांनी केला. तसेच ज्यांच्या मतावर निवडून आलात त्यांना गद्दार म्हणत असाल तर अगोदर राऊत आणि खासदारकीचा राजीनामा द्यावा, मग गद्दार म्हणावे. शिवसेना आम्ही संपवली नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने संजय राऊताच्या मदतीने शिवसेना संपवली आहे, असेही ते म्हणाले.

आमची शिवसेना जिवंत : म्हस्के पुढे म्हणाले की, अजित पवार यांनी एकनाथ शिंदेचे शिवसेनेत काय योगदान अशी टीका केली होती. त्यावर बोलताना नरेश मस्के म्हणाले की, शिवसेना ही बाळासाहेब ठाकरेंची आहे बाळासाहेबांच्या विचाराची आहे. मग त्याच मताप्रमाणे पाहिले तर उद्धव ठाकरेंचे शिवसेनेसाठी योगदान काय? त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने संजय राऊत यांना सोबत घेऊन पद्धतशीरपणे शिवसेना संपवण्याचा घाट घातला आणि ती संपवली. परंतु आम्ही बाळासाहेबांच्या विचारावर आमची शिवसेना जिवंत ठेवली आहे, असे सुद्धा नरेश मस्के म्हणाले आहेत .

अजित पवारांनी केली होती टीका : कसबा विधानसभा मतदारसंघाच्या प्रचार सभेत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे सरकार गद्दार सरकार आहे, अशी टीका केली होती. आणि एक प्रकारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बाळासाहेबांची शिवसेना गद्दार म्हटले होते. आता शिवसैनिकांनी बदला घ्यावा, असा आवहान केले होते. याला प्रत्युत्तर नरेश म्हस्के यांनी दिले आहे.

हेही वाचा : Ashish Shelar : 'सामना'तून बरीच ऍसिडिटी फ्लॅश झालेय! होऊ दे एकदम साफ - आशिष शेलार

Last Updated : Feb 13, 2023, 8:20 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.