पुणे : मुंढवा येथील केशवनगरमध्ये कोयता हातात घेऊन दहशत माजवणाऱ्या आरोपीची मुंढवा पोलिसांनी धिंड काढली आहे. या प्रकरणी पोलिसांनी सोपान रामेश्वर सावंत, वय २२ वर्ष, रा. सदाशिवनगर, गांधीला वस्ती, फुरसुंगी आणि अभिषेक संजय जरांडे, वय २० वर्ष, रा. जय गंगानगर, केशवनगर मुंढवा पुणे यास अटक करण्यात आली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, काही दिवसांपूर्वी केशवनगर भागात मेडिकल स्टोअरमध्ये वस्तू खरेदी करून पैसे न देता लोखंडी हत्याराचा धाक दाखवला होता. तसेच मारहाण करून दहशत निर्माण केली होती. याबाबत पोलिसांकडे तक्रार दाखल झाल्यावर याची तात्काळ दखल घेत पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
त्वरीत होणार कारवाई : या कारवाईमुळे मुंढवा-केशवनगर भागातील व्यापारी व व्यवसायीक नागरीक, महिला यांच्यात सुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. नागरीक, महिला यांना कोणी धाक, दहशत दाखवत असेल तर त्यांच्यावर त्वरीत कारवाई करण्यात येईल असे आवाहन, मुंढवा पोलीस ठाणेकडून करण्यात आले.
कोयता गँगकडून दहशत : याआधीही अशीच एक घटना घडली होती. पुणे शहरात मध्यंतरी तर शहरात मोठ्या प्रमाणावर कोयता गँगकडून दहशत माजवण्यात आली होती. मात्र, पुणे पोलिसांकडून घेण्यात आलेल्या कॉम्बीग ऑपरेशनमुळे मोठ्या प्रमाणात शहरातील विविध भागातील भाईंना पकडण्यात आले होते. चतु:श्रृंगी परिसरामध्ये दहशत माजवण्यासाठी गोळीबार करून गाड्यांची तोडफोड करण्यात आल्याची घटना घडली होती. तर चतु:श्रृंगी पोलिस स्टेशनच्या हद्दीत टोळक्याकडून 20 गाड्यांची तोडफोड करण्यात आली होती. वर्चस्ववादातून दोन गटात तुफान राडा झाला होता. यात 14 दुचाकी, 4 चारचाकी आणि एका तीनचाकी वाहनाचा समावेश होता. याप्रकरणी रेकॉर्डवरील गुन्हेगारांसह 18 ते 20 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते.
हेही वाचा -