ETV Bharat / state

टेमघर धरणाची गळती रोखण्यात यश, पाटबंधारे विभागाचा दावा - गळती रोखण्यात यश

पुणे शहराला खडकवासला, वरसगाव, पानशेत आणि टेमघर या 4 धरणातून पाणी पुरवठा केला जातो. यातील टेमघर धरणातून २०१६ मध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी गळती सुरू झाली होती. याची प्रशासनाने गंभीर दखल घेऊन काम सुरू केले. सध्या या धरणाचे ९० टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित काम २०२० प्रर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे.

टेमघर धरण
author img

By

Published : Jul 17, 2019, 8:04 AM IST

पुणे - टेमघर धरणाला लागलेली गळती रोखण्याचे काम 90 टक्के पूर्ण झाले असल्याचा दावा पाटबंधारे विभागाने केला आहे. उर्वरीत 10 टक्के काम 2020 पर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता प्रवीण कोल्हे यांनी दिली आहे.

टेमघर धरणाच्या गळतीचे काम ९० टक्के पूर्ण

पुणे शहरासाठी खडकवासला, वरसगाव, पानशेत आणि टेमघर या 4 धरणातून पाणी पुरवठा केला जातो. मात्र, टेमघर धरणाला 2010 पासूनच गळती सुरू झाली होती, पण त्याचे प्रमाण कमी होते. त्यानुसार 2013 मध्ये यावर काम करण्यात आले होते. पण, त्यानंतरही गळती आटोक्यात आली नाही. 2016 ला धरणातून पुन्हा मोठ्या प्रमाणावर गळती झाली. यावर राज्य सरकारने धरणातील पाणी गळतीची गंभीर दखल घेत धरणाचे बांधकाम करणार्‍या कंपन्या आणि 22 अभियंताच्या विरोधात फौजदारी कारवाई करण्यात आली असल्याचेही कोल्हे यांनी सांगितले.

त्याप्रमाणेच टेमघर धरणातून होणारी गळती रोखण्यासाठी राज्य सरकारकडून 100 कोटींची विशेष तरतूद करण्यात आली आहे. त्यानुसार 2016 पासून 80 कोटी खर्च करून 90 टक्के गळती रोखण्यात यश आले आहे. तसेच उर्वरित 10 टक्के गळती रोखण्याचे काम मे 2020 पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. दरम्यान, यंदाच्या पावसाळ्यामध्ये टेमघर धरण पूर्ण क्षमतेने भरण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

Intro:पुणे - टेमघर धरणाच्या गळती रोखण्‍याचे काम 90 टक्के पूर्ण झाले आहे. त्याप्रमाणेच उर्वरीत 10 टक्के गळती रोखण्याचे काम मे 2020 पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे, अशी माहिती पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता प्रवीण कोल्हे यांनी दिली आहे.Body:यासंदर्भात प्रवीण कोल्हे म्हणाले की, पुणे शहरासाठी खडकवासला, वरसगाव, पानशेत आणि टेमघर या 4 धरणातून पाणीसाठा केला जातो. मात्र, टेमघर धरणातून 2016 ला मोठ्या प्रमाणावर गळती झाली होती. यानंतर राज्य सरकारने धरणातील पाणी गळतीची गंभीर दखल घेत धरणाचे बांधकाम करणार्‍या कंपन्या आणि 22 अभियंताच्या विरोधात फौजदारी कारवाई करण्यात आली आहे.

त्याप्रमाणेच टेमघर धरणातून होणारी गळती रोखण्यासाठी राज्य सरकारकडून 100 कोटींची विशेष तरतूद करण्यात आली आहे. त्यानुसार 2016 पासून 80 कोटी खर्च करून 90 टक्के गळती रोखण्यात यश आले आहे. तसेच उर्वरित 10 टक्के गळती रोखण्याचे काम मे 2020 पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे.

दरम्यान, यंदाच्या पावसाळ्यामध्ये टेमघर धरण पूर्ण क्षमतेने भरण्यात येणार असल्याचे ही त्यांनी सांगितले आहे.

Byte and Visuals Sent on Mojo
Byte Pravin Kolhe
Visuals Temghar DamConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.