मुंबई - शाळांमध्ये शस्त्रांचे प्रदर्शन करणाऱ्यांवर कारवाई न करणे ही बाब घातक असल्याचे वक्तव्य राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केले. ज्या प्रकारे मुलांना शाळेत शस्त्रांचे प्रदर्शन आणि त्यासंदर्भात ट्रेनिंग दिले जात आहे ते बेकायदेशीर असल्याचेही मलिक म्हणाले.
पिंपरी चिंचवडमध्ये भाजप आमदाराच्या शाळेत विश्व हिंदू परिषदेने अत्यंत घातक अशा शस्त्रांचे प्रदर्शन विद्यार्थ्यांच्या माध्यमातून करत हिंदुत्वाचा नारा दिला. त्याविरोधात राज्यात आणि देशात प्रतिक्रिया उमटल्या आहेत. अशा प्रकारे शस्त्रांचे प्रदर्शन करणे हे घातक असल्याचे मत नवाब मलिक यांनी व्यक्त केले.
ज्या प्रकारे मुलांना शाळेत शस्त्रांचे प्रदर्शन आणि त्यासंदर्भात ट्रेनिंग दिले जात आहे ते बेकायदेशीर असून, राज्याच्या हितासाठी घातक आहे. अशा प्रकारे शस्त्रांचे प्रदर्शन करणाऱ्या कोणत्याही संघटनेला आळा घालण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी पावले उचलणे आवश्यक आहे. त्यामुळे या गंभीर प्रकरणाची मुख्यमंत्र्यांनी तत्काळ दखल घेऊन भाजप समर्थक असलेल्या या संघटनेवर तत्काळ कारवाई करणे गरजेचे असल्याचे नवाब मलिक म्हणाले.