ETV Bharat / state

घरात संशयास्पद अवस्थेत सापडला विवाहित महिलेचा मृतदेह, हत्येचा संशय - पुणे खून बातमी

पुण्याच्या नानापेठे परिसरात राहणाऱ्या 30 वर्षीय महिलेची हत्या झाल्याचे उघडकीस आले आहे. रेश्मा राधेश्याम शर्मा असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे.

Suspected woman found dead in house
घरात संशयास्पद अवस्थेत सापडला विवाहित महिलेचा मृतदेह, हत्येचा संशय
author img

By

Published : Mar 14, 2020, 3:00 AM IST

पुणे - शहरातील नानापेठे परिसरात महिलेची हत्या झाल्याचे उघडकीस आले आहे. रेश्मा राधेश्याम शर्मा (वय.30)असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. शुक्रवारी रात्रीच्या सुमारास ही घटना उघडकीस आली आहे.

हेही वाचा - पुण्यातून धूम ठोकलेले कोरोना संशयित कुटुंब अद्याप बेपत्ता

समर्थ पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार, शर्मा कुटुंबीय मूळचे राजस्थान येथील रहिवासी आहेत. मागील काही वर्षांपासून ते नाना पेठेत राहतात. त्यांचा केटरिंगचा व्यवसाय आहे. शुक्रवारी काही कामानिमित्त राधेश्याम शर्मा कोल्हापूरला गेले होते. रात्री ते घरी परत आले असता त्यांना दरवाजा कुलूपबंद अवस्थेत दिसला. त्यांनी पत्नीला फोनही केला. पण तिने फोन न उचलल्याने त्यांनी पोलिसांशी संपर्क साधला. दरम्यान, पोलिसांनी घरी येऊन कुलूप तोडून आत प्रवेश केला असता त्यांना घरात रेश्मा यांचा मृतदेह आढळला. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवला. राधेश्याम हे शुक्रवारी दुपारपासून पत्नी रेश्माला फोन करीत होते. पण त्या प्रतिसाद देत नव्हत्या. अशी माहीती पोलिसांनी दिली. मृत रेश्माच्या अंगावर मारहाणीच्या खुणा किंवा जखमाही आढळलेल्या नाही. त्यामुळे हत्येचे कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतरच खुनाचे कारण माहीत होईल अशी माहीती पोलिसांनी दिली असून समर्थ पोलीस अधिक तपास करीत आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.