ETV Bharat / state

Sushma Andhare Reaction : सत्तेपुढे शहाणपण चालत नाही, सुषमा अंधारेंचा राणेंना चिमटा - Andhare Reaction on Nitesh Rane

आमदार नितेश राणेंविरोधात मध्यरात्रीपासून पुण्यातील बंडगार्डन पोलीस स्टेशनच्या बाहेर तृतीय पंथी समाजाच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी पोलिसांकडून या तृतीय पंथींची धरपकड करण्यात आली. यावर शिवसेनेच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी आपले मत व्यक्त करत, सत्ताधारी भाजप शिंदे सरकार आणि राणे यांच्यावर टीका केली आहे.

sushma andhare
सुषमा अंधारे
author img

By

Published : Jul 12, 2023, 4:48 PM IST

माहिती देताना सुषमा अंधारे

पुणे : आमदार नितेश राणे यांनी तृतीय पंथीयांबाबत केलेल्या अवमानजनक व्यक्तव्याबद्दल राणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात येत आहे. नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करताना केलेल्या ट्विटमध्ये तृतीयपंथीयांचे प्रमुख असे म्हटले होते. यावर आता तृतीयपंथीयांनी आक्रमक भूमिका घेतली आहे.

तृतीय पंथीयांना टार्गेट करणे अशोभनीय : सुषमा अंधारे म्हणाल्या की, सत्तेच्यापुढे शहाणपण चालत नाही. त्यामुळे सत्ताधाऱ्यांना कोणावर गुन्हा दाखल करायचा कोणावर नाही हे त्यांनी ठरवले आहे. आज विरोधकांवर खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत. पण जिथे सत्य घटना आहे तिथे मात्र गुन्हा दाखल होत नाही. हे पाहता गृहमंत्र्यांनी त्यांची सर्व शक्ती विरोधकांना नामोहरम करण्यासाठी लावली आहे. आता जे सुरू आहे ते पाहता निलेश, नितेश राणे आपल्या संस्काराचा परिचय देत आहेत. त्यांचे अभिनंदन आहे, ते त्यांचे संस्कार दाखवत आहेत. असे असताना तृतीयपंथीयांना टार्गेट करणे अशोभनीय आहे.

सत्ता आता मुजोरांच्या ताब्यात : बंडगार्डन येथे झालेल्या प्रकाराबाबत अंधारे म्हणाल्या की, पोलिसांनी जे केले आहे ते अत्यंत चुकीचे तसेच निषेधार्य आहे. आम्हाला न्याय द्या ही मागणी करने देखील आता फडणवीस यांच्या काळात गुन्हा ठरत आहे. आज पोलीस प्रशासन सरकारच्या इशाऱ्यावर काम करत आहे. सत्ता आता मुजोरांच्या ताब्यात आहे. असे देखील यावेळी अंधारे म्हणाल्या आहेत.

ट्रॅफिक जाम करण्याचा प्रयत्न : तृतीयपंथी आक्रमक होत रास्ता रोको करत असताना पोलिसांकडून या तृतीयपंथींची धरपकड करण्यात आली. यावेळी मोठा गोंधळ झालेला पाहायला मिळाला. यावेळी बंडगार्डन पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पाटील म्हणाले की, आम्ही त्यांना आंदोलन करू देत होतो. पण जेव्हा त्यांनी रास्ता रोकोचा प्रयत्न केला तेव्हा आम्ही त्यांना पकडले आहे. त्यांच्याकडून ट्रॅफिक जाम करण्याचा प्रयत्न केला जात होता. तेव्हा आम्ही त्यांना पकडले असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले.

हेही वाचा -

  1. Rupali Chakankar : सुषमा अंधारे यांच्याबाबतचा कोणताही अहवाल महिला आयोगाकडे आला नाही - रुपाली चाकणकर
  2. Sushma Andhare : उपमुख्यमंत्र्यांबाबत सुषमा अंधारेंचा मोठा गौप्यस्फोट; 'या' तारखेला बसणार धक्का
  3. Mahaprabandhak Yatra: महाप्रबोधन यात्रेत धडाडणार संजय राऊत यांची तोफ; सुषमा अंधारे काय बोलणार याकडे लागले लक्ष

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.