ETV Bharat / state

मोदी सरकारमुळे अर्थव्यवस्था कोलमडली...कठोर टीका करत सुप्रिया सुळेंचा अर्ज दाखल

. देशात बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या वाढल्या असून अर्थव्यवस्था कोलमडली आहे. मात्र, मोदी आणि इतर सत्ताधारी व्यक्तिगत पातळीवर टीका करत आहेत. पण, इतर कोणी व्यक्तिगत टीका करत असले तरी आम्ही अशी टीका करणार नाही, असे त्या म्हणाल्या.

खासदार सुप्रिया सुळे
author img

By

Published : Apr 3, 2019, 2:06 PM IST

पुणे - राज्यातील लक्षवेधी लढत असलेल्या बारामती मतदारसंघात सुप्रिया सुळे यांनी बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. पुण्यातल्या कौन्सिल हॉल येथील विभागीय आयुक्त कार्यालयात सुप्रिया सुळे यांनी आघाडीकडून अर्ज भरला. आघाडीकडून अर्ज भरण्यापूर्वी जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आले. यावेळी सुप्रिया सुळे यांनी भाजप सरकारवर कठोर शब्दात टीका केली.

मोदी व्यक्तीगत टीका करतायत, मात्र आम्ही करणार नाही असे सुप्रिया म्हणाल्या

नरपतगिरी चौकात आघाडीची ही सभा झाली. यावेळी सुप्रिया सुळे म्हणाल्या, की नोटबंदीने सर्वसामान्य जनतेच्या कष्टात वाढ झाली. देशात बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या वाढल्या असून अर्थव्यवस्था कोलमडली आहे. मात्र, मोदी आणि इतर सत्ताधारी व्यक्तिगत पातळीवर टीका करत आहेत. पण, इतर कोणी व्यक्तिगत टीका करत असले तरी आम्ही अशी टीका करणार नाही, असे त्या म्हणाल्या.

बारामती मतदारसंघात आव्हान उभे राहिले असल्याचे विचारले असता, ही कठीण परीक्षा समजत नाही. आपण आपला अभ्यास करत राहायचे, अशी प्रतिक्रिया सुळेंनी दिली. इंदापूर तसेच बारामती मतदारसंघात काँग्रेस पक्षाकडून आपल्याला भरपूर सहकार्य मिळत असल्याचे सुप्रिया यांनी सांगितले. एकजुटीने काम करून विजयी होऊ, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

अर्ज दाखल करताना आघाडीचे नेते दिलीप वळसे पाटील, हर्षवर्धन पाटील यांच्यासह काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय जगताप तसेच अनेक कार्यकर्ते उपस्थित होते. त्याचबरोबर सुळे यांचे पती सदानंद सुळे, मुलगी रेवती आणि बहीण नीता पाटील देखील हजर होत्या.

Intro:mh pune 01 03 supriya sule form filling avb 7201348Body:mh pune 01 03 supriya sule form filling avb 7201348

Anchor
राज्यातील लक्षवेधी लढत असलेल्या बारामती मतदारसंघात सुप्रिया सुळे यांनी बुधवारी उमेदवारी अर्ज दाखल केलाय. पुण्यातल्या कोन्सिल हॉल इथल्या विभागीय आयुक्त कार्यालयात सुप्रिया सुळे यांनी आघाडीकडून अर्ज भरला. यावेळी आघाडीचे नेते दिलीप वळसे पाटील, हर्षवर्धन पाटील यांच्यासह काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय जगताप तसेच अनेक कार्यकर्ते उपस्थित होते त्याचबरोबर सुळे यांचे पती सदानंद सुळे, मुलगी रेवती आणि बहीण नीता पाटील हजर होत्या. दरम्यान अर्ज भरण्यापूर्वी आघाडीने जोरदार शक्तिप्रदर्शन केलं. नरपतगिरी चौकात सभा घेऊन सरकार वर हल्लाबोल केलाय. यावेळी सुप्रियाताईनी सरकारवर टीका केलीय. नोटबंदीने सर्वसामान्य जनतेच्या कष्टात वाढ झाली, देशात बेरोजगारी शेतकरी आत्महत्या वाढल्या असून अर्थव्यवस्था कोलमडलीआहे मात्र मोदी आणि इतर सत्ताधारी व्यक्तिगत पातळीवर टीका करत असल्याच त्या म्हणाल्या इतर कोणी व्यक्तिगत टीका करत असले तरी आम्ही अशी टीका करणार नाही. मोदी देशाचे पंतप्रधान असून एका पक्षाचे नाहीत. त्यामुळे व्यक्तीगत नाही तर विकासावर निवडणूक लढायला पाहिजे, असे सुळे यांनी म्हटलंय. सरकार धमकी देऊन भीती दाखवून काम करत असल्याचा आरोप त्यांनी केलाय. बारामती मतदारसंघात आव्हान उभे राहिले असल्याचं विचारलं असता ही
कठीण परीक्षा समजत नाही. आपण आपला अभ्यास करत राहायचा असे सांगत इंदापूर तसेच बारामती मतदार संघातल्या काँग्रेस ची ताकद असलेल्या भागात आपल्याला सहकार्य मिळत असल्याचं सांगत काँग्रेस कार्यकर्ते सहकार्य करत असल्याचं सुप्रिया सुळे म्हणाल्या एकंदरीतच निवडणूक कुठलीही असो एकजुटीने काम करून विजयी होऊ असा विश्वास सुप्रिया सुळे यांनी यावेळी व्यक्त केला

Byte सुप्रिया सुळे, उमेदवार बारामती

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.