ETV Bharat / state

अजित पवारांच्या सत्काराला अवघी बारामती; मात्र सुप्रियांसह रोहित पवार अनुपस्थितच - अजित पवारांच्या सत्काराला सुप्रिया सुळे पोहित पवार अनुपस्थित

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आज बारामतीत जंगी मिरवणूक काढून नागरी सत्कार करण्यात आला. अजित पवारांच्या सत्कार सोहळ्याच्या कार्यक्रमाला पवार कुटुंबियांनी दांडी मारल्याचे पाहायला मिळाले. खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार हे अनुपस्थित असल्याने आणखी पवार कुटुंबांत मतभेद आहेत का? असा प्रश्न अनेकांच्या मनात उपस्थित होतोय.

baramati
अजित पवारांच्या सत्काराला अवघी बारामती
author img

By

Published : Jan 10, 2020, 8:26 PM IST

पुणे - राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आज बारामतीत जंगी मिरवणूक काढून नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी अवघी बारामती लोटल्याचे पाहायला मिळाले. मात्र, अजित पवारांच्या सत्कार सोहळ्याच्या कार्यक्रमाला पवार कुटुंबीयांनी दांडी मारल्याचे पाहायला मिळाले. खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार हे अनुपस्थित असल्याने आणखी पवार कुटुंबांत मतभेद आहेत का? असा प्रश्न अनेकांच्या मनात उपस्थित होतोय.

उपमुख्यमंत्री झाल्यानंतर आज अजित पवार प्रथमच बारामतीत आले. यावेळी बारमातीकरांनी ढोल ताश्यांच्या गजरात त्यांची जंगी मिरवणूक काढली. त्यानंतर बारामतीकरांच्या वतीने अजित पवारांचा नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी अजि तपवार यांच्यासमवेत त्यांचे पुत्र जय पवार आणि पत्नी सुनेत्रा पवार असल्याचे पाहायला मिळाले. यांच्याव्यतिरीक्त पवार कुटुंबातील कोणतीही व्यक्ती या कार्यक्रमाला हजर नसल्याचे पाहायला मिळाले. विशेष म्हणजे सुप्रिया सुळे आणि रोहित पवारांची अनुपस्थितीची यावेळी चर्चा झाली.

विधानसभा निवडणुका झाल्यानंतर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरु असताना अजित पवारांनी थेट भाजपशी होतमिळवणी केली होती. त्यावेळी त्यांनी भाजपकडून उपमुख्यमंत्रीपद पदरात पाडून घेतले होते. त्यानंतर पवार कुटुंबात फुट पडल्याचे पाहायला मिळाले होते. खासदार सुप्रिया सुळेंनी पवार कुटुंबात आणि पक्षात फुट पडल्याचे स्टेट्सही ठेवले होते. मात्र, पुरेसे संख्याबळ अजित पवारांच्या पाठीशी नसल्याने त्यांनी ३ दिवसातच उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. त्यांनतर पवार कुटुंबात सारे काही ठिक नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होता.

Intro:Body:

अजित पवारांच्या सत्काराला अवघी बारामती मात्र, सुप्रियांसह रोहित पवारांची दांडी

पुणे -  राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची आज बारामतीत जंगी मिरवणूक काढून नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी अवघी बारामती लोटल्याचे पाहायला मिळाले. मात्र, अजित पवारांच्या सत्कार सोहळ्याच्या कार्यक्रमाला पवार कुटुंबियांनी दांडी मारल्याचे पाहायला मिळाले. खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार रोहित पवार हे अनुपस्थित असल्याने आणखी पवार कुटुंबांत मतभेद आहेत का? असा प्रश्न अनेकांच्या मनात उपस्थित होतोय.

उपमुख्यमंत्री झाल्यानंतर आज अजित पवार प्रथमच बारामतीत आले. यावेळी बारमातीकरांनी ढोल ताश्यांच्या गजरात त्यांची जंगी मिरवणूक काढली. त्यानंतर बारामतीकरांच्या वतीने अजित पवारांचा नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी अजि तपवार यांच्यासमवेत त्यांचे पुत्र जय पवार आणि पत्नी सुनेत्रा पवार असल्याचे पाहायला मिळाले. यांच्याव्यतिरीक्त पवार कुटुंबातील कोणतीही व्यक्ती या कार्यक्रमाला हजर नसल्याचे पाहायला मिळाले. विशेष म्हणजे सुप्रिया सुळे आणि रोहित पवारांची अनुपस्थितीची यावेळी चर्चा झाली.

विधानसभा निवडणुका झाल्यानंतर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरु असताना अजित पवारांनी थेट भाजपशी होतमिळवणी केली होती. त्यावेळी त्यांनी भाजपकडून उपमुख्यमंत्रीपद पदरात पाडून घेतले होते. त्यानंतर पवार कुटुंबात फुट पडल्याचे पाहायला मिळाले होते. खासदार सुप्रिया सुळेंनी पवार कुटुंबात आणि पक्षात फुट पडल्याचे स्टेट्सही ठेवले होते. मात्र, पुरेसे संख्याबळ अजित पवारांच्या पाठीशी नसल्याने त्यांनी ३ दिवसातच उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. त्यांनतर पवार कुटुंबात सारे काही ठिक नसल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होता.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.