ETV Bharat / state

Sunil Tatkare Press Conference: निवडणूक आयोग आम्ही घेतलेल्या निर्णयावरच शिक्कामोर्तब करेल - सुनील तटकरे - ncp party name and symbol

Sunil Tatkare Press Conference : निवडणूक आयोग आम्ही घेतलेल्या निर्णयावर शिक्कामोर्तब करेल, असं आज सुनील तटकरे यांनी सांगितलंय. पुण्यात आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार गट) प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते.

Sunil Tatkare Press Conference
सुनील तटकरे
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 9, 2023, 8:29 PM IST

सुनील तटकरे यांची प्रतिक्रिया

पुणे Sunil Tatkare Press Conference : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी शिंदे फडणवीस सरकारसोबत जाऊन दुसरा भूकंप केला. अजित पवारांच्या बंडाळीमुळे राष्ट्रवादीत दोन गट पडले. राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांकडून केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आम्हीच राष्ट्रवादी असल्याचे दावे करण्यात आले आहेत. आता यावर अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आपलं मत व्यक्त केलंय. ते म्हणाले की, आम्ही घेतलेल्या निर्णयाची पूर्ण माहिती घेत आम्ही निवडणूक आयोगाला माहिती दिलीय. मला खात्री आहे की, निवडणूक आयोग त्यांच्या प्रक्रियेनुसार निर्णय घेईल. आम्ही घेतलेल्या निर्णयावर शिक्कामोर्तब करेल, असा विश्वास यावेळी तटकरे यांनी व्यक्त केलाय.

राज्यभर सभा घेण्यात येणार : यावेळी ते म्हणाले की, उद्या कोल्हापूर येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या अध्यक्षेखाली सभा होणार आहे. या सभेला सर्वच नेते मंडळी उपस्थित राहणार आहेत. जशी ऐतिहासिक सभा बीडमध्ये झाली, त्याच पद्धतीची सभाही कोल्हापूरमध्ये देखील होणार आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार हे उद्या सकाळी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराचे दर्शन घेऊन कोल्हापूरकडे रवाना होणार आहेत. आम्ही जी भूमिका घेतलीय, ती राज्यातील जनतेला सांगण्यासाठी या सभा घेत आहोत. कोल्हापूरनंतर खानदेश त्यानंतर विदर्भ करत राज्यभर सभा घेण्यात येणार आहे. (Sunil Tatkare Press Conference Pune)

सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय : ते पुढे म्हणाले की, 2 जुलै रोजी जेव्हा आम्ही महायुतीच्या सरकारमध्ये सहभागी झालो. तेव्हा सर्वोच्च न्यायालयानं अलीकडच्या काळात दिलेले निर्णय, निवडणूक आयोगानं दिलेल्या निर्णयांचा वैज्ञानिक कायदेशीरदृष्ट्या विचार केलाय. ज्येष्ठ कायदे अभ्यासक लोकांशी बोलून आम्ही सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतलाय. त्या निर्णयाची माहिती निवडणूक आयोगाला देण्यात आलीय. त्यानुसार काम सुरू केलंय, असं यावेळी तटकरे म्हणालेत.

आमच्या बाजूने शिक्कामोर्तब : प्रफुल्ल पटेल यांनी दिलेल्या तारखेबाबत ते म्हणाले की, बीडच्या सभेत प्रफुल्ल पटेल यांनी जी तारीख दिलीय. ती त्यांनी कार्यकर्त्यांसमोर भाषणाच्या ओघात दिलीय. निवडणूक आयोग एक स्वायत्त संस्था आहे. ते त्यांच्यानुसार निर्णय घेतील. शरद पवारांवर मी आजही आणि उद्याही मत व्यक्त करणार नाही. आम्ही जी राजकीय भूमिका घेतलीय, त्याबाबात निवडणूक आयोग आमच्या बाजूने शिक्कामोर्तब करेल असा विश्वास असल्याचं यावेळी तटकरे म्हणाले. (ncp party name and symbol)

हेही वाचा :

  1. Sunil Tatkare On INDIA: आपण 'इंडिया माता' म्हणत नाही... सुनील तटकरेंचा विरोधी पक्षांच्या नेत्यांवर निशाणा
  2. MahaYuti Vs INDIA : 'इंडिया' आघाडीला शह देण्यासाठी 'महायुती'ची मुंबईत बैठक? तारखा एकच...
  3. Sunil Tatkare : अजित पवार राष्ट्रीय नेते अन् शरद पवार कोण? सुनील तटकरे यांच्याकडे नाही उत्तर

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.