पुणे (पिंपरी) - काँग्रेसला पाच वर्षे विधान परिषदेचे अध्यक्ष पद देण्यात आले होते. परंतु, नाना पटोले यांनी अध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. दरम्यान, यावर मंत्री सुभाष देसाई यांनी भाष्य केले. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यात नाराजी नाही. पटोले चांगलं काम करत होते म्हणून ते हवे होते, अस त्यांनी म्हटलं आहे. तसेच फडणवीस यांना आणखी पाच वर्षे सत्तेसाठी स्वप्न बघावी लागतील, असा टोला सुभाष देसाई त्यांनी लगावला आहे.
सरकार स्थिर, फडणवीसांना पाच वर्षे स्वप्न पाहावी लागणार- सुभाष देसाई - pimpari chinchwad news
राज्यमंत्री सुभाष देसाई आज (शनिवार) पिंपरी-चिंचवडमधील सिम्बॉयसिस स्किल अँड प्रोफेशनल विद्यापीठाच्या पदवी प्रदान समारंभास आले होते. दरम्यान, त्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे.