ETV Bharat / state

'एमपीएससी'च्या परीक्षा पुढे ढकलव्यात, विद्यार्थ्यांची सरकारकडे मागणी - पुणे कोरोना बातमी

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. यामुळे राज्यातील विद्यार्थ्यांकडून एमपीएससीच्या परीक्षा पुढे ढकलण्याची मागणी केली जात आहे.

परीक्षार्थी
परीक्षार्थी
author img

By

Published : Apr 8, 2021, 7:27 PM IST

Updated : Apr 8, 2021, 7:47 PM IST

पुणे - राज्यात सध्या मोठ्या प्रमाणात कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. वाढत्या कोरोनाच्या पाश्वभूमीवर राज्य सरकारकडून होणाऱ्या एमपीएससीच्या परीक्षा पूढे ढकलण्यात याव्या, अशी मागणी पुण्यात शिकणाऱ्या एमपीएससीच्या विद्यार्थ्यांनी केली आहे. सध्या मोठ्या प्रमाणात कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. मध्यंतरी विद्यार्थ्यांच्या वतीने करण्यात आलेल्या आंदोलनामुळे मोठ्या संख्येने विद्यार्थी कोरोनाग्रस्त होत आहे. तर काही पालकांकडून वाढत असलेल्या कोरोनामुळे विद्यार्थ्यांना परीक्षा देण्यासाठी पाठवण्यात येत नाही. म्हणून सरकारने पूढे होणारी परीक्षा काही महिन्यांसाठी पुढे ढकलण्यात यावी, अशी मागणी या विद्यार्थ्यांनी केली आहे.

विद्यार्थ्यांशी बातचित करताना प्रतिनिधई

आंदोलनामुळे 3 विद्यार्थ्यांचा मृत्यू

मध्यंतरी पुण्यात एमपीएससीच्या परीक्षा घेण्यात यावा, या मागणीसाठी मोठ्या प्रमाणात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या वतीने आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनामुळे तीन विद्यार्थ्यांना कोरोना होऊन त्या विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला आहे. तसेच धक्कादायक बाब म्हणजे पाच विद्यार्थ्यांमागे तीन विद्यार्थी हे कोरोना बाधित होत आहे. सध्या राज्याबरोबरच पुणे शहरात देखील कोरोनाचा प्रसार हा मोठ्या प्रमाणात वाढत आहे. यात विद्यार्थीही बाधित होत आहेत. विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे सरकारने पुढे होणारी परीक्षा काही महिन्यांसाठी पुढे ढकलावी, अशी मागणी या विद्यार्थ्यांकडून होत आहे.

विद्यार्थी भीतीमुळे जात नाही रुग्णालयात

सध्या वाढत असलेल्या कोरोनामुळे विद्यार्थ्यांच्या मनात मोठ्या प्रमाणात भीती निर्माण झाली आहे. या भीतीमुळे विद्यार्थी दवाखान्यात देखील जात नाहीत. घरच्या घरी औषधोपचार घेत आहे. राज्यात चार लाखांपेक्षा अधिक विद्यार्थी हे एमपीएससीचे परीक्षा देणार असून कोरोनामुळे परीक्षा पुढे ढकलण्यात यावी, अशी मागणी विद्यार्थी करत आहेत.

हेही वाचा - केंद्राने तातडीने लस उपलब्ध करून द्यावी - खा. सुळे

Last Updated : Apr 8, 2021, 7:47 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.