पुणे - जुन्नर तालुक्यातील बेल्हे येथे अभियांत्रिकी विद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थाचा पाण्यात बुडून मृत्यु झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. श्याम घोडके, असे पाण्यात बुडून मृत्यु झालेल्या विद्यार्थ्यांचे नाव आहे.
श्याम घोडके हा बेल्हे येथील अभियांत्रिकीच्या प्रथम वर्षात शिक्षण घेत होता. काल (रविवार) दुपारच्या सुमारास बांगरवाडी येथील शेत तळ्यात होस्टेलवरील विद्यार्थ्यांसोबत पोहायला गेला होता. मात्र, त्याला पोहता येत नसल्याने तो शेततळ्याजवळ बसला होता. अचानक पाय घसरून तो तळ्यात पडल्याने श्यामचा दुर्दैवी मृत्यु झाला आहे.
दरम्यान काल (रविवार) दिवसभर सर्वत्र जोरदार पाऊस झाला होता. त्यात ही दुदैवी घटना घडली असून विद्यार्थ्यांमध्ये शोकाकुल वातावरण आहे.