ETV Bharat / state

Notice to Chitra Wagh: चित्रा वाघ यांच्या अडचणी वाढणार; बदनामी केल्याप्रकरणी महिला आयोगाची नोटीस - State Women Commission notice to Chitra Wagh

भारतीय जनता पक्षाच्या नेत्या चित्रा वाघ यांना राज्य महिला आयोगाने (State Women Commission) आयोगाची बदनामी केल्याप्रकरणी (defaming the Commission) नोटीस पाठवली आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेत चित्रा वाघ यांना नोटिस (State Women Commission notice to Chitra Wagh) पाठविल्याची माहिती दिली आहे.

Rupali Chakankar
रूपाली चाकणकर
author img

By

Published : Jan 6, 2023, 6:18 PM IST

पुणे : भाजप नेत्या चित्रा वाघ यांना राज्य महिला आयोगाने (State Women Commission) आयोगाची बदनामी केल्याप्रकरणी (defaming the Commission) नोटीस पाठवली असल्याची माहिती महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी दिली आहे. कलम 92 (2) (3) नुसार चित्रा वाघ यांना महिला आयोगानं नोटीस (State Women Commission notice to Chitra Wagh) पाठवण्यात आली आहे. अभिनेत्री आणि मॉडेल उर्फी जावेद प्रकरणात पत्रकार परिषद घेऊन चित्रा वाघ यांनी महिला आयोगाची बदनामी केली असल्याचे रूपाली चाकणकर यांनी सांगितले.

आयोगाची बदनामी केल्याचा ठपका : अनुराधा वेब सिरीज च्या संदर्भात पोस्टरवरून राज्य महिला आयोगाने अभिनेत्री तेजस्विनी पंडित यांना नोटीस पाठवली होती. मात्र तसंच साधर्म्य असलेल्या उर्फी जावेद प्रकरणात महिला आयोग कोणतीही कारवाई करत नाही असं पत्रकार परिषद घेत चित्रा वाघ यांनी राज्य महिला आयोगावर आरोप केले होते. मात्र अभिनेत्री तेजस्विनी पंडित यांना महिला आयोगाने कधीही नोटीस पाठवली नाही. या वेब सिरीजच्या बाबत दिग्दर्शक संजय जाधव यांना महिला आयोगाकडून नोटीस पाठवण्यात आली होती. या नोटीसला संजय जाधव यांनी उत्तरही दिल असल्याचं पत्रकार परिषदेत रूपाली चाकणकर यांनी सांगितले. त्यामुळे महिला आयोगाबाबत चुकीची माहिती पसरवत बदनामी केल्याचा ठपका ठेवून भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ यांना मेलद्वारे नोटीस पाठवली असल्याची माहिती पत्रकार परिषदेतून त्यांनी दिली. तसेच या प्रकरणात दोन दिवसाच्या आत आपलं म्हणणं महिला आयोगाच्या समोर मांडावे. म्हणणं न मांडल्यास या प्रकरणात त्यांचं काहीही म्हणणं नाही, असे महिला आयोग गृहीत धरेल असे देखील रूपाली चाकणकर यांनी सांगितले आहे. पुण्यात पत्रकार परिषद घेऊन रूपाली चाकणकर यांनी दिली.

चित्रा वाघ यांच्यावर टीका : महिला आयोग गेली तीस वर्ष महिलांच्या हक्कासाठी काम करत आहे. तीस वर्षांच्या कारकीर्दीत महिला आयोगाद्वारे महिलांचे प्रश्न सोडवण्यात आले. आजही महिलांच्या न्याय हक्कासाठी राज्य महिला आयोग काम करत असून देशात महाराष्ट्राच्या राज्य महिला आयोगाचा पाचवा क्रमांक असल्याचे रूपाली चाकणकर यांनी चित्रा वाघ यांना आठवण करून दिली. चित्रा वाघ आपल्या सोयीप्रमाणे भूमिका घेत आहेत. उर्फी जावेद प्रकरणात त्यांनी पोलिसात देखील तक्रार केली होती मात्र पोलिसांनी त्यांच्या तक्रारीची कोणतीही दखल घेतली नाही. गृह विभागाने देखील त्यांच्या तक्रारीबाबत दखल घेतली नाही. बालबुद्धीतून चित्रा वाघ यांनी ही तक्रार केली असल्याची टीका रूपाली चाकणकर यांनी पत्रकार परिषदेत केली आहे.

खासदार हेमंत गोडसेंविरोधात तक्रार : नाशिकचे शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे यांच्या विरोधात एका महिलेने तक्रार केली असल्याची माहिती देखील यावेळी रूपाली चाकणकर यांनी दिली. एक पेट्रोल पंप चालक महिलेला खासदार त्रास देत असल्याची ही तक्रार करण्यात आली असल्याचं त्यांनी यावेळी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.