ETV Bharat / state

राज्याच्या परिवहन आयुक्तांची बारामती उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाला अनपेक्षित भेट - राज्य परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे

राज्याचे परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे यांनी बारामती उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाला आज अनपेक्षित भेट दिली. ढाकणे यांनी येथील कार्यालयात असणाऱ्या सोयी सुविधांसह कामकाजाची पाहणी करून माहिती घेतली.

baramati
बारामती उपप्रादेशिक परिवहन कार्यालय
author img

By

Published : Mar 12, 2021, 8:09 PM IST

Updated : Mar 12, 2021, 9:21 PM IST

बारामती - राज्याचे परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे यांनी बारामती उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाला आज अनपेक्षित भेट दिली. ढाकणे यांनी येथील कार्यालयात असणाऱ्या सोयी सुविधांसह कामकाजाची पाहणी करून माहिती घेतली. तसेच बारामती उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या अखत्यारीतील मेडद येथील ब्रेक टेस्ट ट्रॅकची पाहणी केली. पाहणीनंतर त्यांनी समाधान व्यक्त करून येथील प्रशासनाचे कौतुक केले. यावेळी त्यांच्यासह पुण्याचे प्रादेशिक परिवहन अधिकारी अजित शिंदे हेही उपस्थित होते. बारामती उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाचे नवनियुक्त उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र केसकर व मोटार वाहन निरीक्षक विनायक साखरे, हेमंतकुमार सोनवलकर यांनी त्यांचे स्वागत केले.

राज्य परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे

बारामती उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या कक्षेत बारामती, इंदापूर, दौंड या तीन तालुक्यांचा समावेश होतो. या भागातील वाहनधारक मोठ्या संख्येने वाहनांच्या कामासंबंधी बारामतीत येत असतात. योग्यता प्रमाणपत्र, वाहन परवाना, वाहन हस्तांतरण यासह वाहनांच्या संदर्भातील विविध प्रकारच्या कामासाठी तसेच कच्चे व लायसन काढण्यासाठी नागरिकांचा ओढा मोठ्याप्रमाणात बारामती कार्यालयात असतो. या भेटीदरम्यान आयुक्त ढाकणे यांनी सर्व कामकाजाचा आढावा घेतला.

हेही वाचा - अविश्वास ठराव आणा, तिघांची आघाडी किती भक्कम ते समजेल - हसन मुश्रीफ

मेडद येथील ट्रॅक्टर होणार कम्प्युटर राईज

बारामती उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या अखत्यारीत असणाऱ्या मेडद येथील वाहन फिटनेस ट्रॅक सध्या सुस्थितीत आहे. मात्र भविष्यात बारामतीसाठी हा ट्रॅक कम्प्युटर राईज ऑटोमॅटिक फिटनेस सेंटर बनवणार असल्याचा मानस राज्याचे परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना व्यक्त केला. तसेच या ठिकाणी असणारा ॲटोमॅटीक ड्रायव्हिंग टेस्ट ट्रॅक सुद्धा सध्या बंद असून तो पुन्हा चालू करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा - मनसुख हिरेन मृत्यु प्रकरण : एटीएसकडून घटनास्थळी नाट्य रूपांतर

आता लर्निंगसाठी ऑनलाईन सुविधा मिळणार

आता लर्निंग लायसनसाठी प्रत्यक्ष परिवहन कार्यालयात जाऊन कागदपत्रे जमा करण्याची आवश्यकता भासणार नसून, त्यासाठी लागणारी कागदपत्रे जर आधारलिंक असतील तर ती कागदपत्रे ऑनलाइन पद्धतीने अपलोड करू शकता यासंबंधीच्या सूचना संबंधितांना देण्यात आले असल्याचे ढाकणे यांनी सांगितले.

हेल्मेट वापरण्याचे बारामतीकरांना आवाहन

बारामतीतील रस्ते व इतर सर्वच सोयीसुविधा अत्यंत उत्तम आहेत. येथील बारामतीतील रस्त्यांवर वाहतुकीची शिस्त योग्य वाटली. मात्र बारामतीतील अनेक नागरिक विना हेल्मेट वाहने चालवत असल्याची खंत व्यक्त करून राज्याचे परिवहन आयुक्त ढाकणे म्हणाले की, दुचाकी धारकांनी हेल्मेट वापरणे आवश्यक आहे. अनेकदा विना हेल्मेट वाहन चालवत असताना एकदा अपघात होऊन डोक्याला मार लागल्यास जीव जाण्याचा धोका अधिक असतो.

हेही वाचा - उद्योगपती गौतम अदानींच्या संपत्तीत जगात सर्वाधिक वाढ; एलॉन मस्कलाही टाकले मागे

Last Updated : Mar 12, 2021, 9:21 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.