ETV Bharat / state

Nana Patole On Ajit Pawar : सत्यजित तांबे प्रकरण अजित पवारांनी चव्हाट्यावर आणले; नाना पटोले यांचा आरोप - बाळासाहेब थोरात

संत्यजीत तांबेचे प्रकरण चाहट्यावर आणण्याचे काम विरोधी पक्षनेते अजित पवारांनी केल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. अजित पवारांसाठी जनतेचे प्रश्न संपले का? असा सवाल देखील नाना पटोले यानी उपस्थित केला. आता सर्व ड्रामा संपलेला असून त्यावर आमचे प्रवक्ते उत्तर देतील असे पटोले यांनी म्हटले आहे.

Etv Bharat
Etv Bharat
author img

By

Published : Feb 4, 2023, 8:30 PM IST

Updated : Feb 4, 2023, 9:37 PM IST

सत्यजित तांबे प्रकरण अजित पवारांनी चाहट्यावर आणले

पुणे : नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवारीवरून काँग्रेसमध्ये बंडखोरी झाली. त्यावरून अनेक आरोप-प्रत्यारोप झाले. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचे मेहुणे डॉ. सुधीर तांबे यांचं पक्षातून निलंबनही झालं. मात्र, आता सत्यजीत तांबे यांनी निवडणुकीत अपक्ष उमेदवार म्हणून विजय मिळवल्यानंतर महाराष्ट्र काँग्रेसवर गंभीर आरोप केले आहेत. बाळासाहेब थोरात यांना अडचणीत आणण्यासाठी आणि आमच्या कुटुंबाला काँग्रेस बाहेर ढकलण्यासाठी षडयंत्र रचण्यात आले, असा आरोप सत्यजीत तांबेंनी केला. यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आपल मत व्यक्त केलं आहे. ते म्हणाले की हा सर्व पक्षीय जो हाय व्होल्टेज ड्रामा झालेला आहे. हे सर्वांना माहीत आहे. याबाबत त्यांनी जे आरोप केले आहे. त्याबाबत आमचे प्रवक्ते संपूर्ण उत्तर घेऊन बोलणार आहे. मग त्यांनी बोलावं. आज सर्वच पक्षातील नेते सांगतात आहे की आम्ही तांबेना मत दिली. म्हणजेच हा हाय होल्टेज ड्रामा आता समोर येत आहे. आज आमच्या समोर महागाई बेरोजगार तसेच सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न आहे. त्यामुळे आम्हाला या हाय व्होल्टेज ड्रामामध्ये फसायचं नाही असे यावेळी नाना पटोले यांनी सांगितल.

पवारांनी वाद चहाट्यावर आणला : राज्य महिला काँग्रेस पक्षाकडून दोन दिवसीय प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यावेळी बोलत होते. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी सत्यजित तांबे यांच्या बाबतीत केलेल्या विधानावर नाना पटोले यांना विचारला असता ते म्हणाले की याबाबत हाय कमांड निर्णय घेणार आहेत. मी आता राष्ट्रवादीबाबत बोलणार नाही. कारण त्या पद्धतीने अजित पवार यांनी आमच्या नेत्यांवर टीका केली आहे. ते महाविकास आघाडीमध्ये असताना देखील अशा पद्धतीने टीका करत आहे. तसेच तंबे यांचा घरचा प्रश्न असताना देखील त्याला चव्हाट्यावर आणण्याचं काम अजित पवार हे करत आहे. त्यांच्या साठी जनतेचे प्रश्नही संपलेले आहेत का असा संतप्त सवाल यावेळी नाना पटले यांनी केला आहे.

प्रवक्ते उत्तर देतील : सत्यजित तांबे यांच्याबाबत नाना पटोले यांना विचारला असता ते म्हणाले की आमचे प्रवक्ते याबाबत सविस्तर माहिती देणार आहे. कोणा विषयी काय बोलावं काही नियम असतात, याबाबत आमचे प्रवक्ते बोलतील. मी राज्यातील प्रमुख असल्याने मला सर्वांचेच ऐकावं लागतं. विरोधक काय बोलतात त्यांच्या देखील ऐकावा लागतं. त्यामुळे मी संपूर्ण सत्यजित तांबे यांनी जे काही सांगितलं आहे ते ऐकलेला आहे. आमचे प्रवक्ते यावर बोलतील असं यावेळी नाना पटोले म्हणाले.

विखेवर पद्धतशीर बोलणार : विखे पाटील यांच्या बाबत नाना पटोले यांना विचारला असता ते म्हणाले की, मी विखे पाटील यांच्या बाबत काही दिवसांनी बोलणार आहे. तेही पद्धतशीरपणे बोलणार आहे. ते माझे मित्र देवेंद्र फडणवीस यांच्या मागे लागलेले आहेत. त्यांना त्यांची जागा घ्यायची आहे. त्यामुळे मी त्यांच्यावर पद्धतशीरपणे काही दिवसांनी बोलणार आहे असे नाना पटोले म्हणाले.

उमेदवार उद्या जाहीर होणार : कसबा पोटनिवडणुकीबाबत काँग्रेसच्या 7 प्रमुख उमेदवारांची यादी आम्ही हायकमांड ला पाठविली आहे. उद्या पर्यंत नावे सर्वासमोर येतील. हे नाव महाविकास आघाडी म्हणून जाहीर होणार आहे. आम्ही सर्व उमेदवारांची यादी तयार केली आहे. तसेच पक्षाच्या वतीने सर्व्हे देखील करण्यात आला असून कसबा बाबत आमचा उमेदवार उद्या जाहीर होणार आहे असे पटोले यांनी सांगितले.

काम झाले की फेकुन द्या : कसबा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाकडून हेमंत रासने यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तसेच मुक्ता टिळक यांचे पती शैलेश टिळक यांना डावलण्यात आले आहे. यावर नाना पटोले यांना विचारले असता ते म्हणाले की, भारतीय जनता पक्षाची आपण नियत बघितली तर, एखाद्याचा काम झालं की त्याला फेकून द्या अशा पद्धतीचा त्यांची नियत आहे. भारतीय जनता पक्षाला जेव्हा गरज वाटत होती, तेव्हा तेव्हा मुक्ता टिळक या आजारपणात देखील मतदानासाठी येत होत्या.

महाविकास आघाडीत वाद नाही : एवढ्या निष्ठावंत कार्यकर्त्याला अशा पद्धतीने डावलन योग्य नाही. यातून भाजपची प्रवृत्ती ही आपल्याला पाहायला मिळत आहे असं यावेळी नाना पटोले म्हणाले. महाविकास आघाडीमध्ये अंतर्गत वाद सुरू आहे का यावर विचारला असता ते म्हणाले की आमच्यात कोणताही वाद नसल्याचे ते म्हणाले.

हेही वाचा - Shambhuraj Desai Challenges Aaditya Thackeray : हिंमत असेल तर, पाटणमधून निवडणूक लढवून दाखवा; शंभूराज देसाईंचे आदित्य ठाकरेंना आव्हान

Last Updated : Feb 4, 2023, 9:37 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.