पुणे: मुंबई येथील जे. जे. रुग्णालयाच्या नेत्र विभागातील प्रमुख डॉक्टर राघिनी पारेख आणि वरिष्ठ डॉक्टर यांच्या सह 9 डॉक्टरांनी अचानक राजीनामा दिला. यानंतर रुग्णालयातील जवळपास 700 निवासी डॉक्टर संपावर गेले आहेत. याचा मोठा परिणाम रुग्ण सेवेवर झाला आहे आणि तिथे रुग्णांचे हाल होत आहेत. हे राज्य शासनाने तात्काळ थांबवले पाहिजे, अशी मागणी सर्व स्तरातून होत आहे.
'या' कार्यक्रमाला पवारांची उपस्थिती: श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड तोलनार पगारदार नोकरांची सहकारी पतसंस्थेच्या 25 व्या वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यामध्ये पाहुणे म्हणून राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार उपस्थित होते. यावेळी ते मंचावरून बोलत होते.
मुंबईच्या जे. जे. रुग्णालयातील 750 निवासी डॉक्टर बेमुदत संपावर गेलेले आहेत. येथे उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांचे हाल होत आहे. हे सरकारने तात्काळ थांबविलेपाहिजे. अशा प्रश्नांवर मार्ग काढण्यात राज्य सरकार कमी पडत आहे. यावर तातडीने मार्ग काढण्याची गरज आहे. - अजित पवार, विधानसभा विरोधी पक्षनेता
'त्या' प्रस्तावाचे स्वागतच, पण: अजित पवार यांना अहमदनगरच्या नामांतराबाबत विचारले असता ते म्हणाले की, महापुरुषांचे नाव द्यायचे प्रस्ताव येतात तेव्हा आम्ही सर्व राजकीय व्यक्ती त्याचे स्वागतच करत असतो; पण स्वातंत्रवीर सावरकर यांचा एक कार्यक्रम सरकारने घेतला. यामध्ये अहिल्यादेवी होळकर आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे पुतळे काढले गेले. हे दाखवायला सुरुवात झाली तेव्हा पुतळे हलवायचे काय कारण होते? असा प्रश्न पवारांनी उपस्थित केला.
'त्यावर' राजकारण करू नये: शिंदे-भाजप शासन काळात महापुरुषांबद्दल बेताल वक्तव्ये केली जात आहेत. राज्य शासनाने नामांतरासाठी हीच वेळ का निवडली? हे देखील पाहावे लागेल. नामांतराच्या विषयात कोणीही राजकारण आणू नये, असे यावेळी अजित पवार म्हणाले.
हेही वाचा: