ETV Bharat / state

अफगाण विद्यार्थ्यांबरोबर राज्य सरकार खंबीरपणे उभे - मंत्री उदय सामंत - undefined

अफगाणिस्तान देशातील संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे असून त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचे अन्याय होणार नाहीत. पुढील शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी लक्षात घेता सहानुभूतीपूर्वक विचार करून आवश्यक ती मदत केली जाईल.

uday samant
उदय सामंत
author img

By

Published : Aug 29, 2021, 5:20 PM IST

पुणे - राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या सूचनेनुसार आज पुण्यात अफगाणिस्तानच्या विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी जाणून घेतल्या. या विद्यार्थ्यांमध्ये एक आयसीआयआर मधून प्रवेश घेतलेले आणि दुसरे सेल्फ फंडिंगमधून प्रवेश घेतलेले, असे दोन प्रकार आहेत. पुणे विद्यापीठात 541 अफगाणिस्तानी विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे. काही तांत्रिक कारणामुळे काही विद्यार्थ्यांचे प्रवेश थांबले आहेत. महाराष्ट्र शासन राज्यात असलेल्या अफगाणिस्तानातील विद्यार्थ्यांच्या पाठीशी पूर्णपणे उभे आहे. त्यांच्या कोणत्याही अडचणी सोडवण्यासाठी शासन त्यांच्या बरोबर आहे, अशी आश्वासन उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी दिली. तसेच आठवड्याभरात पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या सोबत बैठक घेऊन पुढील दिशा ठरविण्यात येणार असल्याचे देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी शरद संस्थेच्यावतीने आयोजित महाराष्ट्रातील अफगाण विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला. ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरिअल सोसायटीचे इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी याठिकाणी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी उच्च शिक्षण संचालक धनराज माने सर्वच संस्थेचे अध्यक्ष संजय नहार, किरण साळी आदी मान्यवर उपस्थित होते.

व्हिसाबाबत केंद्र सरकारशी चर्चा करून मार्ग काढण्यात येईल -

अफगाणिस्तान देशातील संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे असून त्यांच्यावर कोणत्याही प्रकारचे अन्याय होणार नाहीत. पुढील शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी लक्षात घेता सहानुभूतीपूर्वक विचार करून आवश्यक ती मदत केली जाईल. तसेच व्हिसाबाबत केंद्र सरकारच्या परवानगी बाबत चर्चा करून प्रश्नदेखील मार्गी लावण्यात येईल, असे आश्‍वासन देखील यावेळी सामंत यांनी या विद्यार्थ्यांना दिले.

मंत्री ऐकत नसेल तर केंद्राने कारवाई करावी -

जनआशीर्वाद यात्रा लोकांच्या आशीर्वादासाठी आयोजित करण्यात यावी, असे केंद्राच्या नेते मंडळींनी सांगितलं होतं. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेनेवर टिका करणे एवढंच या यात्रेचा भाग राहिला आहे. उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केल्यावर काय होते हे टिका करणाऱ्यांना आणि महाराष्ट्राच्या जनतेला माहित झाले आहे. जनआशीर्वाद यात्रा राजकारणाचा भाग न होता राज्यासाठी काय करणार आहे? हे सांगण्यासाठी व्हायला पाहिजे. एकीकडे केंद्र सरकार सांगत आहे का कोरोनाचे नियम पाळणे पाहिजे. तर दुसरीकडे त्यांच्याच मंत्री ऐकत नसतील तर केंद्राने त्यांच्यावर देखील कारवाई केली पाहिजे? असेही मतही यावेळी मंत्री सामंत यांनी व्यक्त केले.

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.