पुणे : सिद्धांत प्रशांत मेहता (वय २४, रा. पुरानिक्स अभितान्ते सोसायटी, बावधान, ता. मुळशी जि. पुणे) अशी या आरोपीची ओळख आहे. त्याच्या राहत्या घरात परराज्यातील अवैध स्कॉचचा साठा आढळून आला. या ठिकाणी विविध ब्रँडमध्ये विदेशी स्कॉचच्या ७५० मिलि क्षमतेच्या ५० बाटल्या तसेच १००० मिलि क्षमतेच्या ५ बाटल्या असा एकूण रुपये २,१७,४३५/- किमतीचा मुद्देमाल आढळून आला. दारूबंदी गुन्ह्यातील मुद्देमाल मिळून आल्याने आरोपीस अटक करून त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा १९४९ अन्वय दि. १३/०१/२०२३ रोजी गुन्हा नोंद करण्यात आला.
गुप्त माहितीच्या आधारे छापेमारी : पोलिसानी दिलेल्या माहितीनुसार, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक चरणसिंग राजपूत यांना गुप्त बातमीदारमार्फत बातमी मिळाली की, एका व्यक्तीने हरियाणा राज्यात विकण्यासाठी मोठा स्कॉचचा साठा आपल्या घरी साठून ठेवला आहे. त्याप्रमाणे चरण सिंह राजपूत यांच्या मार्गदर्शनखाली टीम तयार करून आरोपीच्या राहत्या घरी छापा टाकण्यात आला. यावेळी त्याच्या घरात परराज्यातील अवैध स्कॉचचा साठा आढळून आला.
राज्य उत्पादन शुल्क विभागाची कर्तव्यदक्षता : सांगली जिल्ह्यात ऊसाच्या शेतात सुरू असलेली गांजाची लागवड गांजा शेती पोलिसांनी उध्वस्त केली होती. मिरजेच्या शिपुर येथे तब्बल पाऊण एकरमध्ये गांजा शेतीची लागवड करण्यात आल्याचा प्रकार समोर आला होता. राज्य उत्पादन शुल्क विभागाने ऑगस्ट, 2022 रोजी छापा टाकून कोट्यावधी रुपयांची 486 गांजाची झाडे जप्त करत या प्रकरणी एकास अटक केली होती.
गुप्त माहितीच्या आधारे केली कारवाई : मिरज तालुक्यातल्या शिपुर या ठिकाणी ऊसाच्या शेतात करण्यात आलेल्या गांजा शेतीचा राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून पर्दाफाश करण्यात आला होता. शिपुर येथील नंदकुमार बाबर यांच्या बाबर मळा, गट नंबर 313 मध्ये 30 गुंठे मध्ये चार फुटांवर एक गांजा लागवड करण्यात आल्याची माहिती मिरज उत्पादक शुल्क विभागाला मिळाली होती. त्यानुसार शुक्रवारी पहाटे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने बाबर यांच्या शेतात छापा मारला असता, याठिकाणी ऊसाच्या शेतात आंतरपीक म्हणून गांजा लागवड करण्यात आल्याचे समोर आले. 20 गुंठ्यांत पूर्ण वाढ झालेली गांजाची झाडे आणि 10 गुंठ्यामध्ये गांजाची लहान झाडे आढळून आली होती. छाप्यामध्ये सुमारे 486 गांजीची झाडे उखडून जप्त करण्यात आली. या झाडांचे वजन 1 हजार 59 किलो वजन असून बाजार भावनानुसार एक कोटी 5 लाख 92 हजार रुपये किंमत आहे, अशी माहिती सांगलीच्या राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक संध्याराणी देशमुख यांनी सांगितली होती. तर या गांजा शेती प्रकरणी एकास अटक करण्यात आली होती.
हेही वाचा : Mumbai Crime : आयकर फाइल्स क्लिअर करण्यासाठी लाच मागितली, दोघांना 3 वर्षांची कारावासाची शिक्षा