ETV Bharat / state

मुंबई, पुणे, हैदराबाद अशी बुलेट ट्रेन सुरु करण्याचा मानस - उपमुख्यमंत्री अजित पवार

बारामती तालुक्यातील कटफळ येथे गावठाण भूमापन ड्रोन सर्वेक्षण कामाचा शुभारंभ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पार पडला, यावेळी ते आयोजित कार्यक्रमात बोलत होते. लोकांना कमी कमीत त्रासात व कमी वेळेत एका भागातून दुसऱ्या भागात जाता यावे. दळणवळणाचे उत्तम साधन निर्माण व्हावे. याकरीता मुंबई, पुणे, हैदराबाद अशी बुलेट ट्रेन सुरु करण्याचा मानस आहे, असे अजित पवार यावेळी म्हणाले.

Deputy Chief Minister Ajit Pawar in baramati, pune
मुंबई, पुणे, हैदराबाद अशी बुलेट ट्रेन सुरु करण्याचा मानस - उपमुख्यमंत्री अजित पवार
author img

By

Published : Sep 4, 2021, 6:00 PM IST

बारामती - लोकांना कमी कमीत त्रासात व कमी वेळेत एका भागातून दुसऱ्या भागात जाता यावे. दळणवळणाचे उत्तम साधन निर्माण व्हावे. याकरीता मुंबई, पुणे, हैदराबाद अशी बुलेट ट्रेन सुरु करण्याचा मानस आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आज बारामती दौऱ्यावर होते. तालुक्यातील कटफळ येथे गावठाण भूमापन ड्रोन सर्वेक्षण कामाचा शुभारंभ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पार पडला, यावेळी ते आयोजित कार्यक्रमात बोलत होते.

मुंबई, पुणे, हैदराबाद अशी बुलेट ट्रेन सुरु करण्याचा मानस - उपमुख्यमंत्री अजित पवार

...असे म्हणताच उपस्थितांमध्ये हशा पिकला -

गावामध्ये कोणी जर दहशत माजवण्याचा व त्रास देण्याचा प्रयत्न करत असेल तर कोणताही विचार न करता त्याच्यावर थेट ॲक्शन घ्या. भलेही उद्या त्याच्यावर तडीपार करण्याची व मोक्का लावण्याची वेळ आली, तरी विचार करू नका. अशा सूचना पोलीस प्रशासनाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केल्या. कार्यक्रम चालू असतानाच उपस्थित ग्रामस्थाने गावातील दारू बंद करण्याची विनंती उपमुख्यमंत्री पवार यांच्याकडे केली. तेव्हा पवारांनी सदर कार्यक्रमाला येण्याअगोदरच घडलेला प्रसंग सांगितला. पवार म्हणाले की, एक जण तर दुपारीच चंद्रावर गेला होता. मी त्याला म्हंटले. अरे दुपार हाय. दुपार आहे. श्रावणी शनिवार हाय राव. असे म्हणताच उपस्थितांमध्ये हशा पिकला. पुढे पवार म्हणाले की, काय आता करता... व्यसनाधीन झाल्यानंतरही खूप त्रास होतो. त्यांना व्यसनापासून दूर करण्याचे काम आपण केले पाहिजे.

गणेशोत्सव साध्या पद्धतीने करण्याचे आव्हान -

तिसऱ्या लाटेच्या निमित्ताने कोरोना पुन्हा डोकेवर काढू पाहत आहे. त्यामुळे प्रत्येकाने काळजी घेणे गरजेचे आहे. स्वतःला व आपल्या कुटुंबाला सुरक्षित राहायचे असेल तर अबालवृद्धांनी मास्क लावण्याची सवय लावून घेतली पाहिजे. याला दुसरा पर्याय नाही. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक सण साजरे करता आले नाहीत. परवाची दहीहंडी साजरी करता आली नाही. गणेशोत्सव ही आपल्याला घरगुती पद्धतीने साजरा करायचा आहे. क्रिसमस, बकरी ईद, रमजान आधी सण कोरोनामुळे करता येऊ शकले नाहीत. दुर्दैवाने यामध्ये काहीजण राजकारण करत असल्याची खंत उपमुख्यमंत्री पवार यांनी बोलून दाखवली.

हेही वाचा - OBC Reservation : कोणत्याही समाजघटकावर अन्याय होणार नाही - अजित पवार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.