ETV Bharat / state

राजगुरुनगरात 2 दिवसांसाठी कडक लॉकडाऊन; घराबाहेर न पडण्याचे आवाहन

author img

By

Published : Apr 15, 2020, 8:10 AM IST

पिंपरी चिंचवड शहरात अंडे विक्री करणा-या व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्यानंतर त्याच्या संपर्कात आलेल्या ८४ व्यक्तींना होमक्वारंटाईन करण्यात आले. हे सर्व चाकण राजगुरुनगर परिसरातील आहेत. त्यामुळे, या परिसरात कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी पोलिसांनी दोन दिवसांसाठी लॉकडाऊन कडक करण्याचा निर्णय घेतला आहे.

राजगुरुनगरला दोन दिवसांसाठी कडक लॉकडाऊन
राजगुरुनगरला दोन दिवसांसाठी कडक लॉकडाऊन

पुणे - कोरोनाचा संसर्ग पुणे आणि पिंपरी परिसरात मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अशात चाकण परिसरात ८४ जणांना होमक्वारंटाईन करण्यात आल्यानंतर राजगुरुनगर शहर दोन दिवसांसाठी कडकडीत बंदचे आवाहन पोलिसांनी केले आहे. अत्यावश्यक सेवा वगळता नागरिकांनी बाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

पिंपरी चिंचवड शहरात अंडे विक्री करणा-या व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्यानंतर त्याच्या संपर्कात आलेल्या ८४ व्यक्तींना होमक्वारंटाईन करण्यात आले. हे सर्व चाकण राजगुरुनगर परिसरातील आहेत. त्यामुळे, या परिसरात कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी पोलिसांनी दोन दिवसांसाठी लॉकडाऊन कडक करण्याचा निर्णय घेतला आहे.

हा कडकडीत बंद १५ आणि १६ एप्रिल या दिवशी असणार आहे. या बंदच्या काळात नागरिकांनी घराबाहेर पडु नये अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल, असा इशारा खेडचे पोलीस निरिक्षक अरविंद चौधरी यांनी दिला आहे. याआधीही राजगुरुनगर शहरात 3 दिवसांसाठी कडकडीत बंद पाळण्यात आला होता. या बंदला नागरिकांनी चांगला पाठिंबा दिला होता त्यामुळे, आता हा दोन दिवसांचा बंदही राजगुरुनगर शहरातील नागरिकांच्या सहकार्यातून पाळला जाईल, असा विश्वास प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.