पुणे - महामारीच्या संकटावर मात करण्यासाठी महसूल विभागातील स्त्रिया कर्तव्य बजावत होत्या. खेडच्या तहसीलदार सुचित्रा आमले-पाटील यांनी तालुका हेच कुटुंब समजून अहोरात्र काम केले. औद्योगिक वाहतीपासून शहर ते डोंगराळ आदिवासी भागांपर्यत तळागाळात काम करणाऱ्या महिला अधिकारी म्हणून त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
'संपूर्ण तालुका हेच माझे कुटुंब'...कोरोनाच्या संकटात लढणारी 'मर्दिनी' लॉकडाऊनची घोषणा झाल्यानंतर औद्योगिकरणाचे 'हब' म्हणून ओळखलं जाणाऱ्या चाकण औद्योगिक वसाहतीतील व्यवहार ठप्प झाले. या ठिकाणी पाच लाखांपेक्षा आधिक कामगार अडकले होते. या संघर्षाच्या लढाईत एकही नागरिक, कामगार उपाशी झोपणार नाही हा संकल्प करून प्रशासनातील प्रत्येक कर्मचारी महिला तहसीलदार यांच्या खांद्याला खांदा देऊन काम करू लागला.
'संपूर्ण तालुका हेच माझे कुटुंब'...कोरोनाच्या संकटात लढणारी 'मर्दिनी' चाकण औद्योगिक वसाहतीत कामगारांचे जेवण आणि धान्य वाटपाला सुरुवात झाली. यावेळी अनेक कंपन्या, सामाजिक संस्थांनी पुढे येऊन मदतीचा हात दिल्यामुळे या लढाईत प्रत्येक व्यक्तीपर्यंत अन्न पोहोचवण्यात आले. यानंतर जवळपास तीन लाखांपेक्षा अधिक कामगारांना त्यांच्या मूळगावी सुखरुप सोडण्यात तहसिलदार सुचित्रा आमले यांना यश मिळाले. यावेळी कोरोनाची लढाई यशस्वी होत असताना पुणे मुंबई शहरातुन खेड तालुक्यात मोठ्या संख्येने नागरिक येऊ लागले आणि कोरोनाचा समूह संसर्ग झपाट्याने वाढला. हे रोखण्याचे मोठे आव्हान स्वीकारत तहसीलदार सुचित्रा आमले यांनी यश मिळवले.लॉकडाऊन काळात नागरिक घरात होते. हाताला काम नसल्याने अनेक प्रश्न घेऊन खेड तालुक्यातील शहाराच्या ठिकाणी नागरिक जमत होते. अशा वेळी रेशन दुकानातून प्रत्येकाला मोफत धान्य वाटप सुरू करण्यात आले.
आदिवासी भागात पोहोचलेल्या पहिल्याच तहसीलदारभिमाशंकरपासून कर्जतच्या बाजूला डोंगरदऱ्यात असणाऱ्या 25 कुटुंबाच्या वस्तीला कोरोना म्हणजे काय, हे माहित नव्हते. याबद्दल माहिती कळल्यानंतर डोंगरातून पायी प्रवास करत तहसीलदार सुचित्रा आमले या पहिल्या अधिकारी त्या ठिकाणी पोहोचल्या. या नागरिकांचा जगाशी संपर्क नसताना त्यांना धान्य, किराणा व औषधे जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यात आला.
भामा-आसखेड धरणग्रस्तांचा संघर्ष
कोरोनाची लढाई सुरू असताना भामा-आसखेड धरणग्रस्तांचे पुनर्वसनासाठी मोठे आंदोलन उभे राहिले. 23 गावांतील नागरिक, महिला, लहान मुले आंदोलनाच्या माध्यमातून जलाशयाच्या पाण्यात उतरुन आंदोलनाला सुरुवात झाली. एकीकडे तालुक्यात कोरोनाचा संसर्ग वाढत होता. तर दुसरीकडे भामा-आसखेड आंदोलन सुरू झाले. यावेळी देखील हे आंदोलन नियंत्रणात आणण्यात त्यांनी यश मिळवले.