ETV Bharat / state

पुणे जिल्ह्यात 'ज्वारीचे पीक' सर्वाधिक रोगराईच्या संकटात

दुष्काळानंतर पावसाने यावर्षी बळीराजाला चांगली साथ दिली.त्यामुळे रब्बी हंगामात डोंगराळ व जिरायत भागात ज्वारीची लागवड पुणे जिल्ह्यात सर्वाधिक झाली. मात्र, सध्याच्या वातावरणातील बदलामुळे ज्वारीचे पीक अडचणीत आले आहे.

author img

By

Published : Jan 20, 2020, 7:36 AM IST

Updated : Jan 20, 2020, 9:14 AM IST

sorghum crop
ज्वारीचे पिक

पुणे - दुष्काळानंतर पावसाने यावर्षी बळीराजाला चांगली साथ दिली. त्यामुळे रब्बी हंगामात डोंगराळ व जिरायत भागात ज्वारीची लागवड पुणे जिल्ह्यात सर्वाधिक झाली. मात्र, सध्याच्या वातावरणातील बदलामुळे ज्वारीचे पीक अडचणीत आले आहे. ज्वारी पिकावर करपा व चिटका रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे.

पुणे जिल्ह्यात 'ज्वारीचे पीक' सर्वाधिक रोगराईच्या संकटात

हेही वाचा... अजित पवार म्हणतात... 'तिथं सुरू झालं म्हणजे इथं सुरू करा' असं नसतं

जनावरांचा चारा व धान्य मोठ्या प्रमाणात उत्पादन मिळेल, या आशेने रब्बी हंगामात डोंगराळ व जिरायत शेतीत मोठ्या प्रमाणात ज्वारीची लागवड करण्यात आली. मात्र, सध्याची थंडी व वातावरणातील धुक्यामुळे ज्वारीचा दाणा भरलाच नाही. तर याऊलट ज्वारीची वाढही कमी जास्त प्रमाणात होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कृषी अधिकाऱ्यांचा सल्ला घेऊनच उपाययोजना करण्याचे आवाहन, कृषी विभाकडुन करण्यात आले आहे.

जनावरांच्या चारा व धान्यासाठी ज्वारी हे महत्वाचे पीक मानले जाते. मात्र, सध्या सततच्या ढगाळ हवामानामुळे हेच ज्वारी पीक धोक्यात आले. ज्वारी वरती तांबेरा, चिकटा या रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने ज्वारीला ऐन मोसमात दाणेच भरत नसल्याने शेतकरी पुरता हतबल झाला आहे.

हेही वाचा... शिर्डी-पाथरी वाद : नाना पटोलेंची प्रतिक्रिया...

पुणे जिल्ह्यात जवळपास 2 लाख 924 हेक्टर क्षेत्रापैकी 1 लाख 52 हजार 240 हेक्टर वर ज्वारीचे उत्पन्न घेतले जाते. पुणे जिल्ह्याच्या 13 तालुक्यात किती हेक्टर जमीनीवर ज्वारीचे उत्पन्न घेतले जाते ते पाहूयात...

  • शिरुर तालुका - 14 हजार हेक्टर
  • हवेली तालुका - 363 हेक्टर
  • मुळशी तालुका - 612 हेक्टर
  • भोर तालुका - 11 हजार 776
  • मावळ तालुका - 356 हेक्टर
  • वेल्हे तालुका - 71 हेक्टर
  • जुन्नर तालुका - 9 हजार 530 हेक्‍टर
  • खेड तालुका - 12 हजार 670 हेक्टर
  • आंबेगाव तालुका - 336 हेक्टर
  • बारामती तालुका - 40 हजार हेक्टर
  • इंदापूर तालुका - 8 हजार 906 हेक्टर
  • दौंड तालुका - 5 हजार 61 हेक्टर
  • पुरंदर तालुका - 20 हजार 506 हेक्टर.

हेही वाचा... अरुणास्त..! 1986 ला याच कोकणकड्यावरून अरूण सावंत यांनी काढला होता मृतदेह

डोंगराळ भागात मोठ्या कष्टातुन उभी केलेली ज्वारीची पिके, शेतकऱ्यांना धान्य तर जनावरांना चारा देते. मात्र, सध्या निसर्गाच्या लहरीपणामुळे 'ना धान्य ना चारा' अशी अवस्था झाली आहे. सततच्या अस्मानी संकटांनी पिडलेला बळीराजा सरकारच्या स्थिर धोरण नसल्याच्या कारभाराने पुरता हतबल झाला आहे. त्यामुळे त्याला गरज आहे ती सरकारच्या मदतीची. तेव्हा येत्या काळात सरकार या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे अश्रु पुसण्यासाठी मदत करते का, हे पहावे लागेल.

Intro:Anc_दुष्काळानंतर यंदा पाऊसाने बळीराजाला चांगली साथ दिली त्यामुळे रब्बी हंगामात डोंगराळ व जिरायत शेतीत ज्वारी लागवड पुणे जिल्ह्यात सर्वाधिक झाली मात्र सध्याच्या वातावरणातील बदलामुळे ज्वारीचे पिक अडचणीत येऊन करपा व चिटका रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी अडचणीत सापडलाय चला पहावुयात एक स्पेशल रिपोर्ट...

जनावरांचा चारा व धान्य मोठ्या प्रमाणात उत्पादन मिळेल या आशेने रब्बी हंगामात डोंगराळ व जिरायत शेतीत मोठ्या प्रमाणात ज्वारीची लागवड करण्यात आली मात्र सध्याची थंडी व वातावरणातील धुक्यामुळे ज्वारीला दाणा भरलाच नाही तर ज्वारीची वाढही कमी जास्त प्रमाणात होत आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी कृषी सल्ला घेऊनच उपाययोजना करण्याचे आवाहन कृषी विभाकडुन करण्यात आले

Byte:जयंत भगत (कृषी अधिकारी)
.

Vo_जनावरांच्या चारा व धान्यसाठी ज्वारी हे महत्वाचे पिक मानले जाते मात्र सध्या सततच्या ढगाळ हवामानामुळे हेच ज्वारी पिक आता धोक्यात आले असून ज्वारी वरती तांबेरा चिकटा या रोगांचा प्रादुर्भाव झाल्याने ज्वारीला ऐन मोसमात दाणेच भरत नसल्याने बळीराजा शेतकरी पुरता हतबल झाला आहे.

Byte_तात्याबा खांडेकर _शेतकरी

Vo... पुणे जिल्ह्यातील ज्वारीच्या उत्पन्नावर नजर टाकूयात ग्राफिक्स च्या माध्यमातून..

पुणे जिल्ह्यात जवळपास 2 लाख 924 हेक्टर क्षेत्रापैकी 1 लाख 52 हजार 240 हेक्टर वरती ज्वारीचे उत्पन्न घेतले जाते.

पुणे जिल्ह्याच्या 13 तालुक्यात किती हेक्टर वरती ज्वारीचे उत्पन्न घेतले जाते ते पाहूयात...

शिरुर तालुक्यात 14 हजार हेक्टर
हवेली तालुक्यात 363 हेक्टर
मुळशी तालुक्यात 612 हेक्टर
भोर तालुक्यात 11 हजार 776
मावळ तालुक्यात 356 हेक्टर
वेल्हे तालुक्यात 71 हेक्टर
जुन्नर तालुक्यात 9 हजार 530 हेक्‍टर
खेड तालुक्यात 12 हजार 670 हेक्टर
आंबेगाव तालुक्यात 336 हेक्टर
बारामती तालुक्यात 40 हजार हेक्टर
इंदापूर तालुक्यात 8 हजार 906 हेक्टर
दौंड तालुक्यात 5 हजार 61 हेक्टर
पुरंदर तालुक्यात 20 हजार 506 हेक्टर.

Vo_डोंगराळ भागात मोठ्या कष्टातुन उभी केलेली ज्वारीची शेती शेतकऱ्यांना धान्य तर जनावरांना चारा देते मात्र सध्या निसर्गाच्या लहरीपणामुळे ना धान्य ना चारा अशी अवस्था झालीय

Byte:द्रौपदाबाई लांडे(शेतकरी

Byte:सविता लांडे(शेतकरी

End vo... सततच्या अस्मानी संकटांनी पिडलेला बळीराजा शेतकरी सरकार च्या सुलतानी कारभाराने पुरता हतबल झाला असून त्याला गरज आहे ती आता मायबाप सरकार च्या मदतीची त्यामुळे येत्या काळात मायबाप सरकार या नुकसान ग्रस्त शेतकय्रांचे अश्रृ पुसण्यासाठी मदत करते का हे पाहणे हि महत्वाचे असणार आहे.Body:रेडी टु युस..पँकेज स्टोरी...Conclusion:
Last Updated : Jan 20, 2020, 9:14 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.