पुणे : पिंपरी- चिंचवडमध्ये फेसबुकवरून प्रेम प्रकरण करणाऱ्या बापाची सख्ख्या मुलांनीच हत्या केल्याची खळबळजनक घटना समोर आली (Son Killed Father) आहे. या प्रकरणी मुलगा अभिजित धनंजय बनसोडे आणि सुजित धनंजय बनसोडेला पोलीसांनी अटक केली आहे. धनंजय बनसोडे असे हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. धनंजयचे नाशिक येथील 43 वर्षीय महिलेसोबत गेल्या तीन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. त्यांची ओळख फेसबुकवरून झाली (father love affair on Facebook) होती. त्यांच्या प्रेमाबाबत धनंजयच्या पत्नीला आणि दोन्ही मुलांना समजले होते. याच रागातून त्यांनी वडिलांची हत्या केली.
फेसबुकवरून ओळख : पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, धनंजयची नाशिक येथील 43 वर्षीय महिलेसोबत फेसबुकवरून ओळख झाली (father love affair) होती. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले होते. त्यांनी मोबाईल नंबरची देवाणघेवाण करून व्हाट्सऍपवर चॅटिंग करायचे. दररोज त्यांचा फोन व्हायचा. दरम्यान, 15 ते 16 डिसेंबर 2022 रोजी धनंजयने फोन उचलला नाही. व्हाट्सऍप चॅटिंगला देखील दुसराच व्यक्ती बोलत असल्याचे प्रेयसीला जाणवत होते. त्यामुळे त्यांनी पिंपरी- चिंचवड पोलिसांना फोन करून याबाबतची माहिती दिली. धनंजयचा फरसाण बनवण्याचा कारखाना होता. त्यासाठी धनंजयने काही लाख रुपये प्रेयसीकडून घेतले (love affair on Facebook) होते.
फेसबुकवरून प्रेमकहाणी : म्हाळुंगे पोलिसांनी दोन्ही मुलांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी हत्या केल्याचे सांगितले. वडिलांची गेल्या तीन वर्षांपासून फेसबुकवरून प्रेमकहाणी सुरू होती. यामुळे मुले, पत्नी यांच्यासोबत धनंजयचे पटत नव्हते. धनंजय पत्नीसोबत राहात नव्हता. याच रागातून अभिजित आणि सुजित यांनी झोपेत असलेल्या वडिलांच्या डोक्यात लोखंडी टॉमीने घाव घालत ठार मारले. पुरावा नष्ट करण्यासाठी मुलांनी त्यांच्या च कारखान्यातील भट्टीत मृतदेह जाळला. तेथील राख इंद्रायणी नदीत टाकून दुसरीच राख त्या भट्टीत टाकली. पोलीसांना समजलेच तर त्यांची दिशाभूल करण्यासाठी हा प्लॅन त्यांनी केला होता. 15 ते 16 डिसेंबर 2022 रोजी आमचे वडील बेपत्ता झालेत, अशी मिसिंगची तक्रार त्यांनी म्हाळुंगे पोलिसात दिली (son killed father In Pune) होती.